कौशल्य विषयक शिक्षणासाठी ५३ व्या वर्षी घेतला आयटीआयला प्रवेश; ठरले राज्यातील आयटीआयमध्ये सर्वाधिक वयाचे विद्यार्थी

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: July 23, 2023 07:31 PM2023-07-23T19:31:46+5:302023-07-23T19:32:09+5:30

सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून यात तब्बल ५३ वर्षे वय असलेल्या एका प्रशिक्षणार्थ्याने नुकताच आयटीआयला प्रवेश घेतला आहे. 

Admitted to ITI at 53 for skill education; Oldest students in ITIs in determined state | कौशल्य विषयक शिक्षणासाठी ५३ व्या वर्षी घेतला आयटीआयला प्रवेश; ठरले राज्यातील आयटीआयमध्ये सर्वाधिक वयाचे विद्यार्थी

कौशल्य विषयक शिक्षणासाठी ५३ व्या वर्षी घेतला आयटीआयला प्रवेश; ठरले राज्यातील आयटीआयमध्ये सर्वाधिक वयाचे विद्यार्थी

googlenewsNext

हिंगोली : प्रत्येकांच्या हाताला काम मिळावे, बेरोजगारी कमी व्हावी, या उद्देशाने आयटीआयमध्येही कौशल्यविषयक विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा कल कौशल्यविषयक शिक्षण घेण्याकडे वाढला आहे. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून यात तब्बल ५३ वर्षे वय असलेल्या एका प्रशिक्षणार्थ्याने नुकताच आयटीआयला प्रवेश घेतला आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील ६ शासकीय व ३ खासगी आयटीआयच्या ९५२ जागेसाठी प्रवेश प्रक्रीया सुरू आहे. यासाठी तब्बल  २४२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले असून २५ जुलैपर्यंत प्रवेशाची पहिली फेरी चालणार आहे. आतापर्यंत जवळपास ३० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. दरम्यान, कौशल्यविषयक अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:चा व्यवसाय थाटता यावा या उद्देशाने येथील मस्तानशहानगरातील कान्हाबा काशिदे (वय ५३) यांनीही आयटीआयला प्रवेश घेतला आहे. त्यांना विद्युत मोटार दुरूस्तीचे काम येते. मात्र विजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्यास पंखे, कुलर, विद्युत मोटारी आदी विजेवर चालणारी उपकरणे दुरूस्ती करता येतील.या शिवाय बँकेचे कर्ज मिळण्यास मदत होऊन स्वत:चे दुकान टाकता येईल, यातून रोजगार उपलब्ध होईल या उद्देशाने आयटीआयला प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले. माणूस हा जन्मभर विद्यार्थीच असतो. दररोज नवीन काहीतरी शिकत असतो. शिक्षणाला वय नसते, असेही ते म्हणाले. दरम्यान, प्रवेश घेतल्याबद्दल काशिदे यांचा आयटीआयच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, एम.आर.हिस्वणकर, कीर्ती बोरकर,यु.बी.जाधव, ए.बी.भुसारे, ए.डी.रावते, जी.पी.चव्हाण, बी.एच.घोडगे,पी.व्ही. हनवते, एस. चवरे, सी.डी.मुलगीर, व्ही.एस.चिंतारे, पी.जी. नवटक्के, पी.के.भिसे आदींची उपस्थिती होती.

स्वतः  व कुटूंबाचा उदर्निर्वाह  करण्यासाठी स्वतः कडे कौशल्य आहे. नवनवीन ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा आहे. मात्र शास्त्रोक्त ज्ञान नव्हते. हे ज्ञान मिळविण्यासाठी तसेच कौशल्यविषयक शिक्षण घेऊन स्वत:चा रोजगार थाटता यावा म्हणून आयटीआयला प्रवेश घेतला. 
- कान्हाबा काशिदे, नूतन प्रशिक्षणार्थी, आयटीआय हिंगोली.
 

Web Title: Admitted to ITI at 53 for skill education; Oldest students in ITIs in determined state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.