अंत्यविधीला जाणाऱ्या वाहनाला अपघात; दोन ठार तर दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 17:42 IST2020-02-14T17:40:14+5:302020-02-14T17:42:39+5:30
वाशिम जिल्ह्यातील मोझरीजवळ १४ फेबु्रवारी रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास अपघात

अंत्यविधीला जाणाऱ्या वाहनाला अपघात; दोन ठार तर दोघे गंभीर जखमी
हिंगोली : अंत्यविधीला जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याने यात दोन ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील मोझरी जवळ १४ फेबु्रवारी रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. आॅटो आणि पिकअप या दोन वाहनांचा अपघात झाला. यातील दोघे मयत आणि जखमी हे हिंगोली शहरातील गारमाळ येथील आहेत.
हिंगोली शहरातील गारमाळ येथील अन्वर बुºहाण प्यारेवाले यांनी याप्रकरणी ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, १४ फ्रेबुवारी रोजी सकाळी साडेचार वाजता फिर्यादी अन्वर प्यारेवाले यांचे नातेवाईक हे अंत्यविधिकरिता कारंजा येथे आॅटो क्र एमएच ३८, ५४२१ ने जात असताना पीकअप वाहन क्र. एमएच ३७ जे- १६७६ च्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी चालवून आॅटोला जबर धडक दिली. यामध्ये पिरु हसन नंदावाले व हसीना बुरान नौरंगाबादी (४५) यांचा मृत्यू झाला. तसेच आॅटोचालक जमील कासम नौरंगाबादी व परवीन सुभान नौरंगाबादी हे गंभीर जखमी झाले आहेत.
याला कारणीभूत सदर पीकअपचा चालक आहे, असे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीकअप चालकाविरुद्ध भादंवी कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला. अपघातात मृत्युमुखी आणी जखमी झालेले हे कारंजा येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जात होते, परंतु वाटेत हा अपघात झाला. तपास एपीआय आदिनाथ मोरे करीत आहेत.