शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रात्र गस्तीवरील पोलिसांच्या जीपचा अपघात; दोन कर्मचारी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 3:34 PM

आखाडा बाळापुर ते रुद्रवाडी रस्त्यावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले.

आखाडा बाळापूर : रात्र गस्तीवर असलेल्या आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याच्या पोलीसांच्या जीपचा गंभीर अपघात सोमवारी मध्यरात्री रुद्रवाडी शिवारात झाला. यात जीपचे मोठे नुकसान झाले असून दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  सोमवारी रात्री सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद शेख बन्ने, वाहन चालक पोलिस शिपाई सुखदेव जाधव हे जीपमधून रात्रगस्ती रवाना झाले होते. रात्री १२.२० वाजेच्या दरम्यान आखाडा बाळापुर ते रुद्रवाडी रस्त्यावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले. गाडी तीन ते चार वेळा उलटली आणि रस्त्याशेजारी खड्ड्यात कोसळली. यात दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार रवी हुंडेकर व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातात चालक गंभीर जखमी आहे. याप्रकरणी बाळापुर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले आहे. 

रुद्रवाडी शिवारात पोलीस जीप गेली कशाला ?या कर्मचाऱ्यांची रात्रगस्त ही आखाडा बाळापूर शहर व मराठवाडा चौकात असल्याचे पोलिस सूत्रांकडून कळाले .मग हे कर्मचारी जीप घेऊन रुद्रवाडी शिवारात कोणत्या तपासासाठी मध्यरात्री गेले ? याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत. कोणाचा पाठलाग करण्यासाठी ही जीप तिकडे गेली ? व तिचा अपघात झाला. यावर चर्चा होत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिसAccidentअपघात