निर्घृणता ! शेतकऱ्याच्या डोक्‍यात कुऱ्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 11:33 IST2020-11-20T11:31:24+5:302020-11-20T11:33:00+5:30

गुरुवारी रात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेले होते.

Abstinence! He put an ax in the farmer's head and threw his dead body in the well | निर्घृणता ! शेतकऱ्याच्या डोक्‍यात कुऱ्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकला

निर्घृणता ! शेतकऱ्याच्या डोक्‍यात कुऱ्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकला

ठळक मुद्देशेतातील विहिरीत आढळला मृतदेह

औंढा नागनाथ:  येथील पद्मावती शिवारात एका शेतकऱ्यावर कुर्‍हाडी वार करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. रवी वाठ असे मृत शेतकऱ्याचे नाव असून पोलीस या निर्घृणपणे केलेल्या हत्येचा अधिक तपास करत आहेत.

रवी वाठ हे गुरुवारी रात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांची हत्या केल्यानंतर मृतदेह जवळच असलेले विहिरीमध्ये फेकून हल्लेखोर पसार झाले. पहाटे शेजारील शेतकरी विहिरीजवळ गेले असता त्यांना रवी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पहाटे सहा वाजल्यापासून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. जमादार आफसर खान पठाण यांनी पंचनामा केला असून याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Abstinence! He put an ax in the farmer's head and threw his dead body in the well