शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

जादूटोणा, करणीच्या संशयातून अपहरण करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 7:08 PM

ग्रामस्थांच्या माहितीनंतर पोलिसांनी केली तत्काळ कारवाई

ठळक मुद्देदोघा आरोपींना अटक, एक फरार

बासंबा (जि. हिंगोली) : तालुक्यातील पारडा येथील शंकर साधू आलझेंडे यांचे अपहरण करून आरोपींनी जादुटोना व करणीच्या संशयातून १२ डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते ११.३० वाजेच्या सुमारास त्यांचा खून केला. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना शुक्रवारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.    

सविस्तर माहिती अशी की हिंगोली तालुक्यातील पारडा येथील शंकर साधु आलझेंडे (५५) यांचे १२ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास आरोपी नागनाथ उर्फ विकास किरण गोविंदपुरे, संतोष किसनआप्पा तोरकड, बाळू उर्फ सिद्धेश्वर रामा तोरकड सर्व रा. पारडा यांनी अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी शंकर आलझेंडे यांना एका निर्जन ठिकाणी नेऊन अश्लिल भाषेत शिवीगाळ करत ‘तू करणी कवटाळ, भानामती, जादुटोणा करतोस या संशयावरून त्यांना जबर मारहाण केली. या जबर मारहाणीत शंकर आलझेंडे यांचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिसांना रात्रीच संपर्क साधून याबबात माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव शंकर आलझेंडे यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी संतोष मारोती आलझेंडे यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा र.नं.२२८/१९ कलम ३०२, ३६४,५०४,५०६, ३४ भादंवि सहकलम ३(२)(५) अ.जा.ज.प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दोघा आरोपींना अटक, एक फरारप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरविली.पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून उपविभागीय पोलीस अधिकारी शहर आर.आर.वैजणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, सहा.फौजदार मगन पवार, पोना प्रवीण राठोड, पोहेकाँ संजय राठोड, कल्याणकर, पोशि काकडे आदींनी तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्यातील मुख्य आरोपी नागनाथ उर्फ विकास किरण गोविंदपुरे, संतोष किशनअप्पा तोरकडे दोघे रा.(पारडा) हे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना १३ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास शिताफीने ताब्यात घेतले. तसेच या गुन्ह्यात आरोपीने वापरलेला आॅटो जप्त करण्यात आला आहे. आॅटोचालक बाळू उर्फ सिद्धेश्वर रामा तोरकड फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर आर.आर.वैजणे हे करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली