बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत युवक जागीच ठार, एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:03 IST2022-12-02T18:03:01+5:302022-12-02T18:03:16+5:30
जखमी तरुणास हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत युवक जागीच ठार, एकजण जखमी
औंढा नागनाथ ( हिंगोली) : तालुक्यातील भोसी गावाजवळ आज सकाळी नऊ वाजता बस व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक युवक ठार तर एकजण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजता हिंगोली -खिल्लार बस ( MH20BL1108) भोसी रस्त्यावरून धावत होती. याच दरम्यान एका दुचाकीवरून ( MH37AC8101) जांभरूण येथील मारोती खोब्राजी जुमडे व सुरज प्रकाश जुमडे हिंगोली रस्त्याने भोसीकडे जात होते. भोसी - जांभळी दरम्यान बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मारोती खोब्राजी जुमडे ( २३) हा युवक जागीच ठार झाला. तर सूरज प्रकाश जुमडे ( २२) हा गंभीर जखमी झाला आहे.
जखमी तरुणास हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेहास औंढा नागनाथ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले आहे. माहिती मिळताच घटनास्थळी औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल लांडगे, बापुराव चव्हाण अमोल चव्हाण यांनी भेट दिली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.