मुलाच्या मृत्यूनंतर चिंतेत बापाने संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2023 18:15 IST2023-03-22T18:14:42+5:302023-03-22T18:15:02+5:30
राहत्या घरी गळफास घेऊन किली आत्महत्या

मुलाच्या मृत्यूनंतर चिंतेत बापाने संपवले जीवन
सेनगाव : मोठ्या मुलाचा तीन महिन्यापूर्वी मृत्यू झाल्याने चिंतेत असलेल्या बापानेही राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथे २१ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली.
अंबर देवबा पवार (वय ४५ रा. वाढोणा) असे आत्महत्या केलेल्या बापाचे नाव आहे. त्यांचा मोठा मुलगा चंद्रप्रकाश पवार यांचा तीन महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे अंबर पवार हे सारखे चिंतेत राहत होते. यातूनच दारूच्या नशेत त्यांनी राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २१ मार्च रोजी रात्री १० वाजता उघडकीस आली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळतास पोलिस निरीक्षक भोईटे, पोलिस उपनिरीक्षक मुपडे, ठेंगे, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख खुद्दूस यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. याप्रकरणी अरविंद पवार यांच्या खबरीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख खुद्दूस तपास करीत आहेत.