उत्तरप्रदेशच्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेने दोन मुलीही पळविल्या
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: March 15, 2023 17:40 IST2023-03-15T17:39:43+5:302023-03-15T17:40:15+5:30
पुण्यात झाली ओळख, आग्रा येथे महिला आणि प्रियकर गेले

उत्तरप्रदेशच्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेने दोन मुलीही पळविल्या
हिंगोली : उत्तरप्रदेशमधील प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेने आपल्या दोन अल्पवयीन मुलीही पळवून नेल्या. या प्रकरणी प्रियकर व महिलेविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात १४ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला.
अमितकुमार उर्फ जितू पाल (रा. आग्रा, उत्तरप्रदेश) असे प्रियकराचे नाव आहे. अमितकुमार पाल हा पुणे येथे कामाला होता. तर हिंगोली जिल्ह्यातील जोडपे दोन अल्पवयीन मुलीसह पुण्याला कामाला गेले होते. तेथे अमितकुमार याचेसोबत जोडप्याची ओळख झाली. याच वेळी त्याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ते दोघेही आग्रा येथे पळून गेले. त्यामुळे महिलेचा पती दोन अल्पवयीन मुलीसह हिंगोली जिल्ह्यात परत आला. दरम्यान, १४ मार्च रोजी दोन्ही अल्पवयीन मुली घरात आढळून आल्या नाहीत. त्यांचा नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र त्या आढळून आल्या नाहीत.
त्यामुळे महिलेच्या पतीने हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. यात अमितकुमार व महिलेने दोन्ही अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून अमितकुमार पाल व महिलेविरूद्ध मंगळवारी रात्री उशिरा हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके, माधव जिव्हारे, जमादार संजय मार्के तपास करीत आहेत.