पिंपराळा गावातील मुक्कामी बस अज्ञातांनी पेटवली; बसचा उरला केवळ सांगाडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 16:45 IST2024-09-23T16:45:50+5:302024-09-23T16:45:50+5:30
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपराळा येथील घटना

पिंपराळा गावातील मुक्कामी बस अज्ञातांनी पेटवली; बसचा उरला केवळ सांगाडा
वसमत (जि. हिंगोली): तालुक्यातील पिंपराळा येथे रविवार मुक्कामी बस मध्यरात्री अज्ञातांनी पेटवून दिली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली. आगीमध्ये बसचे टॉप, आसने, वायरिंग जळून मोठे नुकसान झाले असून केवळ सांगाडा उरला आहे.
वसमत तालुक्यातील पिंपराळा येथे रविवारी मध्यरात्री वसमत आगाराची बस नेहमी प्रमाणे मुक्कामी मुकामी आली होती. एसटी बस गावातील मंदीरा जवळ उभी करण्यात आली होती. चालक व वाहक मंदिराच्या बाजुला आसलेल्या खोलीत नेहमी प्रमाणे झोपले होते. मध्यरात्री अज्ञातांनी एसटी बस पेटवून दिली. बसला आग लागल्याचे ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. लागलेल्या आगीत बसच्या आतिल वरचे भाग,आसने व वायरिंग पूर्णतः जळून मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती कुरुंदा पोलिसांना कळताच सपोनि रामदास निरदोडे, जमादार भगीरथ सवंडकर यांच्या सह आदिनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी चालक रविंद्र दळवी,वाहक माधव देशमुख,सरपंच रामराव कदम यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.