शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ८८ रुग्ण; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोना आजाराची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या काळातही जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या ...

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोना आजाराची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या काळातही जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या वाढतच असून ४ एप्रिल रोजी नवे ८८ रुग्ण आढळून आले. तसेच दोघांचा मृत्यूही झाला असून आतापर्यंतच्या मृताचा आकडा १०१ झाला आहे. जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन तपासणीत १५० पैकी ३७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली परिसरात पळसोना १, ढोलउमरी ११, डिग्रस वाणी ४, पिंपळदरी ५, जिनमातानगर ३, नाईक नगर १, माळधामणी १, कारवाडी १, हनुमाननगर १, आदर्श कॉलनी १, सरस्वतीनगर १, हिंगोली १ असे एकूण ३१ रुग्ण आढळून आले. वसमत परिसरात गिरगाव येथे ३ रुग्ण आढळले, तर कळमनुरी येथे २ रुग्ण आढळले. तसेच औंढा परिसरात वाघी येथे १ रुग्ण आढळला. सेनगाव परिसरात १२ जणांची तपासणी केली असता यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आरटीपीसीआर टेस्टमध्ये ५१ रुग्ण आढळले. यात जयपूर हिंगोली १, रिसाला बाजार ५, हनुमाननगर १, रामाकृष्णानगर ८, पिंपळखुटा २, गंगानगर २, औंढा ना. १, यशवंतनगर १, मारवाडी गल्ली १, एसआरपीएफ कॅम्प ३, कासारवाडा १, डेंटल कॉलेज १, महावीरनगर १, तरोडा नांदेड १, साईनगर १, आंबेडकरनगर २, जिजामातानगर १, गोर्लेगाव १, एनटीसी ५, अंतुलेनगर १, दत्तात्रयनगर १, टीव्ही सेंटर १, सावळा १, बळसोंड १, सीतारामनगर २, वसई १, मंगळवारा १ यांचा समावेश आहे. औंढा परिसरात औंढा १, लाख १, जवळा १ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात एकूण १४१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील २९, लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधील ५८, कळमनुरी ३८, औंढा नागनाथ ११, सेनगाव येथील बरे झालेल्या ५ रुग्णांचा समावेश आहे.

मृताचा आकडा शंभरी पार

जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी कोरानाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात बोल्डा फाटा येथील ८० वर्षीय पुरुषाचा व औंढा येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत १०१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच ७ हजार १४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ६ हजार २५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजघडीला ७८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर असलेल्या १५० रुग्णांना ऑक्सिजन, तर १० रुग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.