शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला ४५० सीटी स्कॅन ; दुप्पट संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:28 IST

हिंगोली : हिंगोली शहरात एक खाजगी तर एक जिल्हा रूग्णालयात सीटी स्कॅन मशीन कार्यन्वित आहे. खाजगी मशीन नुकतीच सुरू ...

हिंगोली : हिंगोली शहरात एक खाजगी तर एक जिल्हा रूग्णालयात सीटी स्कॅन मशीन कार्यन्वित आहे. खाजगी मशीन नुकतीच सुरू झाली असली तरी खरी मदार जिल्हा रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीनवरच आहे. दररोज २५ ते ३० रूग्ण सीटी स्कॅनसाठी येत असून महिनाभरात दुप्पट संख्या वाढली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित असले तरी वाढत्या संख्येंने प्रशासनाची चिंता वाढविली आहे. जिल्ह्यातील कोरोना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होेणाऱ्या रूग्णांवर योग्य निदान व्हावे, यासाठी रूग्णांची सीटी स्कॅन केली जात आहे. इतर जिल्ह्यात सीटी स्कॅन करण्यासाठी जादा रक्कम मोजावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पैशाची जुळवाजुळव करताना नातेवाईक मेटाकुटीस येत आहेत. येथील जिल्हा रूग्णालयात अद्यायावत सीटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या याच मशीनवर जिल्ह्यातील रूग्णांची मदार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ८ या काळात सीटी स्कॅन केंद्र सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारीही दुपारी एक वाजेपर्यंत सीटी स्कॅन सेंटर सुरू होते. तसेच रूग्णही सीटी स्कॅनसाठी आलेले दिसून आले. सध्या दररोज ३० ते ३५ रूग्ण सीटी स्कॅनसाठी येत असल्याची माहिती सीटी स्कॅन केंद्रातून देण्यात आली.

सीटीस्कॅनसाठी दुप्पट रूग्ण वाढले

कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी येथील जिल्हा रूग्णालयातील सीटी स्कॅन सेंटरमध्ये सरासरी २०० रूग्ण येत होते. आता जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालल्याने सीटी स्कॅन करणाऱ्या रूग्णांची संख्या महिन्याला ४५० पर्यंत जात आहे. दररोज २५ ते ३० रूग्ण येत आहेत. दरम्यान, कोरोनाचे निदान झाल्यानंतरच सीटी स्कॅन केलेले संयुक्तीक ठरेल, असे डॉ. स्नेहल नगरे यांनी सांगितले.

जिल्हा रूग्णालयातील मशीनवर सध्या महिन्याला ४५० रूग्णांची सीटी स्कॅन केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी महिन्याला सरासरी २०० रूग्ण सीटी स्कॅनसाठी येत होते.

- रामराव इंगोले, सीटी स्कॅन मशीन तंत्रज्ञ, हिंगोली

जिल्हा रूग्णालयात अद्यायावत सीटी स्कॅन मशीन उपलब्ध करून दिली आहे. गरजू रूग्णांनी खाजगी सीटी स्कॅन केंद्रावर पैसे घालण्यापेक्षा जिल्हा रूग्णालयात स्कॅन करून घेतल्यास पैसेही वाचतील.

- रत्नमाला संजय भूरके, पिंपळदरी

आमच्या नातेवाईकाची खाजगी मशीनवर सीटी स्कॅन केले होते. त्यावेळी जास्त पैसे मोजावे लागले. जिल्हा रूग्णालयात अत्याधुनिक मशीन असल्याची माहिती मिळाल्याने येथे आलो आहे. येथे कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाहीत.

- दत्ता बोंढारे, आखाडा बाळापूर