४३२ ऑक्सिजन बेड झाले रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST2021-05-27T04:31:44+5:302021-05-27T04:31:44+5:30
जिल्ह्यात शासकीय ७ कोविड सेंटर आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयात ९२ रुग्ण दाखल असून यापैकी ८२ ऑक्सिजनवर आहेत. याठिकाणी ऑक्सिजनचे ...

४३२ ऑक्सिजन बेड झाले रिकामे
जिल्ह्यात शासकीय ७ कोविड सेंटर आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयात ९२ रुग्ण दाखल असून यापैकी ८२ ऑक्सिजनवर आहेत. याठिकाणी ऑक्सिजनचे ५६ तर साधे ६२ बेड रिकामे आहेत. नवीन कोविड सेंटरमध्ये १६ ऑक्सिजनवरील तर २८ सौम्य लक्षणाचे रुग्ण दाखल आहेत. येथे ४६ बेड रिकामे आहेत. कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनवरील १७, साधे २४ रुग्ण असून ८३ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. वसमतलाही साधे १० तर ऑक्सिजनवरील ८ रुग्ण आहेत. ४२ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. सिद्धेश्वर येथे १३ साधे तर ४ ऑक्सिजनवरील रुग्ण आहेत. २३ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. कौठा येथे १२ साधे तर २२ ऑक्सिजनवरील रुग्ण दाखल आहेत. १ ऑक्सिजन बेड रिकामा आहे. आयटीआय वसमत येथे सर्व ५० ऑक्सिजन बेड रिकामे आहेत.
हिंगोली जिल्ह्यात १४ खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर चालविण्यास मान्यता दिली होती. या रुग्णालयांनी एकूण ३३२ बेडची मान्यता घेतली होती. यातील सहा वसमतचे तर उर्वरित रुग्णालये हिंगोलीतील आहेत. याठिकाणी आता ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ५७ असून केवळ सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ३७ आहे तर ऑक्सिजनचे १३१ बेड रिकामे झाले आहेत तर सौम्य लक्षणे असलेल्यांसाठीच्या १०७ खाटा शिल्लक आहेत.