धारदार शस्त्राचा धाक दाखवून ४० हजार लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:26 AM2021-02-15T04:26:21+5:302021-02-15T04:26:21+5:30

शिरडशहापूर : वसमत तालुक्यातील वाघी-सिंगीकडून मधील मार्गे दगड गावाकडे स्वतःच्या दुचाकीवर जात असताना पांगरा बोखारेकडे जाणाऱ्या गोल आईजवळ अज्ञाताने ...

40,000 were looted out of fear of sharp weapons | धारदार शस्त्राचा धाक दाखवून ४० हजार लुटले

धारदार शस्त्राचा धाक दाखवून ४० हजार लुटले

Next

शिरडशहापूर : वसमत तालुक्यातील वाघी-सिंगीकडून मधील मार्गे दगड गावाकडे स्वतःच्या दुचाकीवर जात असताना पांगरा बोखारेकडे जाणाऱ्या गोल आईजवळ अज्ञाताने रस्ता अडवून धारदार शस्त्राचा धाक दाखवून एकाकडून २५ हजार व दुसऱ्याकडून १५ हजार रुपये लुटल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रात्रीच्या सुमारास घडली.

वसमत तालुक्यातील वाघी-सिंगीकडून दुचाकीने दगड गावाकडे जात असताना पांगरा बोखारे शिवारात भीमराव पारखे (रा. धामणगाव) यांना एका दुचाकीवरून तिघे जण तोंडाला मास्क लावून आले. दुचाकीसमाेर त्याच्याकडील दुचाकी आडवी लावून वाहन थांबविले. पारखे यांच्या गळ्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेले १५ हजार रुपये घेऊन पसार झाले. तसेच काही अंतरावर दुसऱ्या दुचाकीस्वारांस अडवून त्यांच्याकडील २५ हजार रुपये चाकूचा धाक दाखवून घेतले. यानंतर परिसरातील नागरिकांना माहिती दिल्याने अनेकजण घटनास्थळी आले. नागरिकांनी त्या चाेरट्यांचा व दुचाकी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटे पसार झाले होते. यापूर्वीही या मर्गावर अशाच काही घटना घडल्या आहेत. तसेच दिवसेंदिवस याभागात लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे पोलिसांनी या रस्त्यावर पेट्रोलिंग करण्याची मागणी हाेत आहे. याप्रकरणी घटनेची नाेंद घेण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

Web Title: 40,000 were looted out of fear of sharp weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.