शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

औंढा नागनाथ येथे गहू व तांदळाचा ३७० क्विंटल अवैधसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 6:13 PM

पोलिसांनी जप्त केलेला साठ्यातील नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठवला आहे.

औंढा नागनाथ ( हिंगोली ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व अन्य एका ठिकाणी अवैधरीत्या साठवून ठेवलेला ३७० क्विंटल गहू व तांदळाचा साठा पोलिस प्रशासनाने कारवाई करून जप्त केला. ही कारवाई आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास करण्यात आली. हा साठा स्वस्तधान्य दुकानातील असल्याचा संशय आहे. दोन्ही ठिकाणी महसूल व पोलिसांनी पंचनामा केला आहे. 

बाजार समितीमध्ये गाळा क्रमांक 11 मधील बालाजी ट्रेडिंग कंपनी आणि अन्य एका ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदळाचा अवैधरीत्यासाठा करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश  कलासागर यांना मिळाली. यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती व सौदागर कॉम्प्लेक्स येथील एका दुकानात छापा मारला. येथे महाराष्ट्र शासन खाद्य पुरवठा असे छापलेली पोती आढळून आली. यामुळे हा साठा स्वस्त धान्य दुकानातील असल्याचा संशय आहे. बाजार समितीमधील गोदामात ३०० क्विंटल गहू तर सौदागर कॉम्प्लेक्समध्ये ४० क्विंटल गहू व ३० क्विंटल तांदूळ असा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी फरार आहेत. 

पोलिसांनी जप्त केलेला साठ्यातील नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठवला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे शिवशंभ घेवारे, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, पुरवठा अधिकारी वैजनाथ भालेराव,  जमादार संदीप टाक, गजानन गिरी, ओमकार राजनेकर ,गणेश गायकवाड ,अमोल चव्हाण यांनी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली