24 murders in the last year; Burglary, riots grew | सरत्या वर्षात २४ खून; घरफोडी, दंगे वाढले
सरत्या वर्षात २४ खून; घरफोडी, दंगे वाढले

ठळक मुद्देविविध ठाण्यात दाखल गुन्ह्यांची आकडेवारी

हिंगोली : वर्षभरात जिल्ह्यात खुनाच्या २४ घटना घडल्या आहेत. तर बलात्काराच्या २५ घटना घडल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत काही गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी, इतर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. सरत्या वर्षात एकूण विविध प्रकारचे २ हजार ७० गुन्हे जिल्हाभरातील विविध ठाण्यांत दाखल करण्यात आली आहेत.
दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आकडा फुगत चालला आहे. पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या जातात. शांतता समित्यांच्या बैठका घेऊन कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही केले जाते. परंतु प्रत्येक्षात मात्र गुन्हेगारींच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत काही यावर्षात काही गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु इतर गंभीर गुन्ह्यांची आकेडवारीही वाढली आहे. पोलीस प्रशासनाने ११ नोव्हेंबर २०१८ अखेर दाखल गुन्ह्यांचा तुलनात्मक आराखडा सादर केला आहे. त्यानुसार गतवर्षी म्हणजेच ११ नोव्हेंबर २०१७ मध्ये खुनाच्या २७ घटना घडल्या होत्या. यावर्षी मात्र खुनाच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. यावर्षी २४ खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर गतवर्षी बलात्काराच्या २४ घटना घडल्या होत्या. तर यावर्षी २५ घटना म्हणजेच बलात्काराच्या एका घटनेत वाढ झाली आहे. दरोड्याच्या प्रयत्नांच्या घटना यावर्षी ७ कमी घडल्या आहेत. गतवर्षी १५ घटना घडल्या होत्या. असे असले तरी, घरफोडीच्या घटनांचा आकडा फुगला आहे. गतवर्षी घरफोडीच्या ८३ घटना होत्या. तर यावर्षी ९० घटना आहेत. चोरीच्या घटनाने तर नागरिक भयभीत आहेत. गतवर्षी चोरीच्या १९३ घटना होत्या. तर यावर्षी हा आकडा वाढला असून वर्षभरात २१९ चोरीच्या घटना घडल्या आहेत. घराला कुलुप दिसले की, कुलुप तोडून ऐवज लंपास केला जात आहे. दिवाळी सणात तर घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याने याच संधीचा चोरटे फायदा घेत सक्रीय झाले होते. दंगा करणे या घटनाही वाढल्या आहेत. गतवर्षी १११ दंगे केल्याचे गुन्हे दाखल होते. यावर्षी १५४ गुन्हे दाखल झाले. ठकवणुकीच्या घटनातही यंदा वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गतवर्षी ठकविणेप्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले होते. तर यावर्षी २४ गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपहरणाच्या घटना कमी आहेत. गतवर्षी अपहरण केल्याप्रकरणी ४० जणांवर गुन्हे दाखल केले होते. तर यावर्षी ३५ गुन्हे आहेत. विनयभंगाच्या घटनाही यंदा वाढल्या आहेत. गतवर्षी विविध पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी ८१ गुन्हे दाखल होते. तर यावर्षी विनयभंग प्रकरणी ९५ गुन्हे दाखल आहेत. आत्महत्येस प्रवृत करणे किंवा प्रयत्न केल्याच्या गतवर्षी १७ घटना घडल्या होत्या. यावर्षी ३६ घटनांची पोलीस ठाण्यात नोंद आहे. तसेच ईसीएक्ट, दारूबंदीच्या गुन्ह्यांत यावर्षी घट झाली आहे. तर जुगार खेळण्याणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी जुगारप्रकरणी २६३ गुन्हे दाखल होते. यावर्षी ३३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांविरूद्ध दरदिवशी मोहीम राबविली जाते.
पोलीस प्रशासनातील अधिकारी
पोलीस प्रशासनातील अनेक पदे रिक्त आहेत. अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने कामाचा अतिरिक्त ताण येतो. परिणामी कर्तव्य पार पाडताना पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना अनेक अडी-अडचणींना तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे नुकत्याच पोलीस अधिकाºयांच्या बदल्या झाल्याने पोलीस प्रशासनातील काही पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे शासनाने तात्काळ भरणे गरजेच आहे. ज्यामुळे संबधित विभागातील तसेच ठाण्यातील अधिकारी किंवा कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा ताण येणार नाही.
सण व हल्ला
विविध सण व उत्सवात कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात बंदोबस्त ठेवला जातो. नागरिकांना शांततेचे आवाहन केले जाते. तरीही यंदा सण व हल्ल्याच्या १८ घटना वाढल्या आहेत.

Web Title: 24 murders in the last year; Burglary, riots grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.