भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील १२ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 15:51 IST2021-12-18T15:48:01+5:302021-12-18T15:51:03+5:30
खाजगी वाहनाद्वारे उपचारासाठी नेत असताना झाला मृत्यू

भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील १२ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
नर्सी नामदेव ( हिंगोली ) : नर्सी- सेनगाव रोडवर बाहेती पेट्रोलपंपच्या समोर जीपच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. एकनाथ हरिभाऊ जुमडे ( १८ ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून हा अपघात आज सकाळी ७:१५ वाजताच्या सुमारास झाला.
हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथील एकनाथ हरिभाऊ जुमडे हा हिंगोली येथील एका महाविद्यालयात बारावीमध्ये होता. आज सकाळी एकनाथ नेहमीप्रमाणे दुचाकीवरून (एमएच ३८ वाय ०६३० ) महाविद्यालयासाठी निघाला. दरम्यान, बाहेती पेट्रोलपंपच्या समोरील रोडवर जात असताना हिंगोली येथून सेनगावकडे जात असलेल्या एका भरधाव जीपने ( एमएच ३८-७१९७ ) एकनाथच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघातात एकनाथ जब्बर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोउपनि अशोक कांबळे, गणेश जाधव यांनी अपघातस्थळी धाव घेतली. खाजगी वाहनाद्वारे उपचारासाठी नेत असताना जखमी एकनाथचा वाटेतच मृत्यू झाला आहे.