बारावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2023 15:21 IST2023-07-09T15:20:56+5:302023-07-09T15:21:28+5:30

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

12th class student died | बारावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बारावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

इब्राहीम जहागिरदार, कुरुंदा (जि. हिंगोली): वसमत तालुक्यातील सेलू येथील १२ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कुरुंदा शिवारातील शेतात गळाफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ९ जुलै रोजी सकाळी ८:३० वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सेलू येथील अजय बबन फोले (वय १८) हा अंबाजोगाई येथे १२ वी वर्गात शिक्षण घेत होता. तो काही कामानिमित्ताने गावाकडे आला होता. ९ जुलै रोजी या युवकाने कुरुंदा शिवारात स्वतःच्या शेतातील झाडाला गळाफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, बीट जमादार बालाजी जोगदंड, पोलिस कर्मचारी शंकर भिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नेमक्या कोणत्या कारणामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केली हे काही कळाले नाही. या घटनेचा तपास कुरुंदा पोलिस करीत आहेत. शवविच्छेदन कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद कुरुंदा पोलिस ठाण्यात घेण्याचे काम सुरू होते.

Web Title: 12th class student died