आरटीईत १२२९ आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:54 PM2018-06-10T23:54:30+5:302018-06-10T23:54:30+5:30

आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

 1249 online application in RTE | आरटीईत १२२९ आॅनलाईन अर्ज

आरटीईत १२२९ आॅनलाईन अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यातील आरटीई २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ अर्ज सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणयाचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. परंतु पालकांच्या विनंतीनुसार परत १० जून आॅनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख करण्यात आली. जास्तीत जास्त बालकांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत वारंवार बदल करण्यात आला. जे पालक विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी परत संधी उपलब्ध करून देत १० जून अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आॅनलाई अर्ज करताना पालकांनी पाल्यांची माहिती शासनाने दिलेल्या अटींचे पालन करून भरून घेण्याच्या तसेच रहिवासी पुरव्यानुसार गूगल मॅपमध्ये आॅनलाईन लोकेशन योग्य प्रकारे मॅप करून भरलेल्या माहितीची खात्री करून घेण्याचे सांगण्यात आले होते. आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेश नाकारणाऱ्यांवर आता शिक्षण विभाग काय कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापुर्वी शिक्षण विभागाकडे काही पालकांनी प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींचे दखल घेत पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या.
हिंगोली जिल्ह्यातील ५९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली असून २५ टक्के ६९२ आरक्षित जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला तेव्हापासून १० जून पर्यंत १२२९ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्याचे संकेतस्थळावर दिसून येत होते.
मोफत शिक्षण हक्क कायदा आरटीई २५ टक्के अंतर्गतची सर्व प्रक्रिया आॅनलाईन आहे. १३ मार्च रोजी शिक्षण विभागातर्फे आॅनलाईन सोडत पद्धतीने लॉटरी काढण्यात आली. आता दुसºया फेरीचे शिक्षण विभागातर्फे नियोजन केले जात आहे.
प्राप्त अर्जांची आॅनलाईन पद्धतीने लॉटरी काढून प्रथम फेरी १ किमी अंतरावरील शाळांसाठी झाली. यात २४५ विद्यार्थ्यांपैकी १५० जणांचे पात्र शाळेत प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.

Web Title:  1249 online application in RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.