शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अपघातात वर्षभरात १२२१५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:41 IST

परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे.

ठळक मुद्देहिंगोली : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी प्रयत्न

दयाशिल इंगोले ।हिंगोली : दिवसेंदिवस अपघाताचा आकडा फुगत चालला आहे. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाय-योजना केल्या जातात. मात्र वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे.हिंगोली जिल्ह्यात माहे डिसेंबर २०१७ अखेर एकूण २९४ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात ११८ जणांचा मृत्यू झाला. तर माहे सप्टेंबर २०१८ मध्ये रस्त्यावरील २२५ अपघातात ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.रस्ते अपघात कमी करण्यासाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत माहे नोव्हेंबर २०१८ या महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ वाहनांवर कारवाई करून २ लाख ५७ हजार ५०० रूपये दंड वसूल केला आहे. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. शिवाय रस्तेही खराब असल्याने अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. उप-प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या वायुवेग पथकाने धडक कारवाई करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांना दंड ठोठावला आहे.यामध्ये हेल्मेट न वापराणाºया ३२ चालकांवर कारवाई करून ८ हजार रूपये दंड वसूल केला. तर सिटबेल्टचा वापर न करणाºया दोघांकडून १ हजार रूपये, ईन्शुरन्स नसलेल्या १५ वाहनांवर कारवाई करून ३० हजार ५०० रूपये, माल वाहतूक व प्रवासी वाहतूक दोघांकडून १५ हजार ४०० रूपये, अतिरिक्त भार असलेल्या १४ वाहनांवर कारवाई करून २ लाख २ हजार ६०० रूपये एकूण २ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.मागील चार वर्षांतील अपघाताची आकडेवारीमागील चार वर्षांत जिल्ह्यात २०१४ मध्ये अपघाताच्या २७७ घटना घडल्या असून या अपघातात १०२ जणांचा मृत्यू झाला. तर ४७८ जण जखमी झाले होते. २०१५ मध्ये अपघाताच्या २८८ घटना असून १०९ जणांचा मृत्यू, तर ११६ जखमी. २०१६ मध्ये ३१६ अपघाताच्या घटना घडल्या. तर १२२ जणांचा मृत्यू झाला असून ३३५ जखमी झाले होते. २०१७ या वर्षांत २९४ अपघाताच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये ११८ जणांचा मृत्यू झाला तर ३४२ जण जखमी झाले होते. सदर आकडेवारी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून प्राप्त आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांचे आवाहन...दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. कार चालविताना सीटबेल्ट वापरावा. दारू पिऊन तसेच विनापरवाना व विमाविना वाहने चालवू नयेत. दोषी आढळल्यास चालकाचे लायसन ९० दिवसांसाठी निलंबित केले जाईल. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरटीओ अशोक पवार यांनी केले.७० वाहनचालकांचे परवाने केले निलंबितउप प्रादेशिक परिवहन विभागाने माहे आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१८ मध्ये कारवाई करून वाहन चालविताना दोषी आढळलेल्या ७० वाहन चालकांचे परवाने निलंबित केले आहेत. आक्टोबर महिन्यात ५२ तर नोव्हेंबर महिन्यात १८ एकूण ७० वाहनचालक वाहने चालविताना दोषी आढळून आले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघातDeathमृत्यू