Young or old, it's up to you! | तरुण राहायचं की वृद्ध, हे तुमच्याच हातात!

तरुण राहायचं की वृद्ध, हे तुमच्याच हातात!

आपण म्हातारे होतो म्हणजे आपल्या अनेक क्षमता कमी होत जातात. वय जसजसं वाढत जातं, तसतसं आपल्या क्षमतांमध्ये घट होत जाते. अर्थात याच्या उलट लहानपण आणि तरुणपण. या काळात आपल्या क्षमता वाढत असतात आणि निरंतर त्यात वाढही होत असते. तुमचा आहार, दिनचर्या आणि तुमची आरोग्यशैली, व्यायाम उत्तम असेल, तर या क्षमतेत आणखी वाढ होते; 

 


पण जैवशास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर मध्यम वयानंतर सर्वसाधारणपणे आपल्या कार्यक्षमता घटत जातात. मॉलिक्युलर आणि सेल्युलर डॅमेज यांची प्रक्रिया निरंतर सुरू असते. व्यायाम, आनंदी राहणं आणि आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीच्या आधारावर आपल्या शरीराचा जो ऱ्हास होत असतो, तो आपण कमी करू शकतो; पणहा ऱ्हास सुरूच असतो. आपली शारीरिक क्षमता कमी होत असते, मेंदूची क्षमता कमी होत असते, आजारांचा आणि आजारांना बळी पडण्याचा धोका सातत्यानं वाढत असतो आणि आपल्या महत्त्वाच्या क्षमतांचा संक्षेप झाला की कालांतरानं आपला मृत्यू होतो; पण प्रत्येक वेळी हे बदल एकरेषीय आणि सातत्यानं होत असतात असं नाही. 


उदाहरणार्थ, समजा दोन सत्तर वर्षांचे वृद्ध घेतले तर त्या दोघांचीही शारीरिक आणि मानसिक क्षमता एकच असेल असं नाही. एखादा वृद्ध या वयातही एनर्जेटिक, उत्तम आरोग्य आणि तब्येत असलेला, उत्साही, कार्यतत्पर आणि वेगवेगळ्या आव्हानांना सतत सामोरा जाणारा असू शकतो. त्याचवेळी दुसरा वृद्ध मात्र अतिशय गर्भगळीत, आजारी, अनुत्साही, निराश, अगदी सहजपणे उठू-बसू न शकणारा तसंच इतरांच्या मदतीशिवाय काहीही करू न शकणारा असू शकतो. 
आपल्या आयुष्यात होणारे बदल, निवृत्त होणं, आपलं घर बदलणं, दुसऱ्या शहरात स्थलांतर करणं, ज्यांच्याबरोबर आपण उठलो-बसलो-खेळलो-वाढलो, त्या सोबत्यांचा मृत्यू होणं, आपला जीवनसाथीच आपल्याला सोडून जाणं... यासारख्या गोष्टीही तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात आणि त्यानुसारही वृद्धापकाळातलं आपलं वृद्धत्व आणि ‘तारुण्य’ अवलंबून असतं. 
त्यामुळे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसा प्रतिसाद देता, यावरच तुमचं आनंदी किंवा दु:खी वार्धक्य अवलंबून असतं. त्यामुळे आनंदी आणि ॲक्टिव्ह वृद्धत्वाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, तरुण राहायचं असेल, तर त्यासाठी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद द्यायला आपण शिकलं पाहिजे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Young or old, it's up to you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.