(Image Credit : EndocrineWeb)
महिला सामान्यपणे थायरॉइड हार्मोनला वजन वाढण्याला जबाबदार मानतात. पण सत्य हे आहे की, थायरॉइड व्यतिरिक्तही आपल्या शरीरात असे अनेक हार्मोन्स असतात जे वजन वाढण्याला अधिक जबाबदार असतात. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ब्रेन हार्मोनही वजन वाढण्याचं एक मुख्य कारण आहे. शरीरात जर कोणत्याही हार्मोनचं असंतुलन झालं तर तुमचं वजन वाढणं सुरू होतं. त्यामुळे फिट राहण्यासाठी शरीरात हार्मोनचं संतुलन ठेवणे गरजेचं आहे.
थायरॉइड हार्मोन
घशाजवळ असलेला थायरॉइड ग्लॅंड्स तीन प्रकारचे हार्मोन रिलीज करतो. टी ३, टी ४ आणि कॅलसीटोनिन. हे हार्मोन आपली झोप, मेटाबॉलिज्म, हार्ट रेट आणि आपला ब्रेन कंट्रोल करतात. कधी कधी थायरॉइड ग्लॅंड थायरॉइड हार्मोन रिलीज करू लागतात. ज्याने हायपोथायरॉडिज्मचा धोका वाढतो. हा हायपोथायरॉडिज्म वजन वाढणे, डिप्रेशन आणि हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलशी संबंधित आहे. याचं संतुलन बिघडलं तर महिलांमध्ये वजन ५ ते १० किलो वाढू शकतं.
कसं कराल कंट्रोल?
यावर उपाय म्हणून आयोडाइज्ड मिठाचा वापर कमी करा. तसेच व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचं सेवन अधिक करा. यात तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्सही घेऊ शकता. त्यासोबत झिंक तत्व असलेले पदार्थ खावेत.
हंगर म्हणजे भूक हार्मोन
हंगर हार्मोनला घ्रेलिन हार्मोन नावानेही ओळखलं जातं. ब्लड स्ट्रीममध्ये घ्रेलिन हार्मोनचं प्रमाण अधिक झालं तर वजन वाढू लागतं. इतकेच नाही तर जेव्हा लोक स्ट्रीक्ट डाएट करतात किंवा फास्टींग करतात तेव्हा हे हार्मोन वाढू शकतात. त्यामुळे आपल्या डाएटवरही विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
कसं कराल कंट्रोल?
दररोज एकाच वेळी भरपूर जेवण करण्याऐवजी दर तीन तासांनी थोडं थोडं खावं. जेवण करण्याआधी पाणी आवर्जून प्यावं. जेवताना पाणी पिऊ नये. तसेच वर्कआउटही रोज करावं.
मेलाटोनिन हार्मोन
मेलाटोनिन हार्मोनचं बॅलन्स बिघडण्यामुळे महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते. हे हार्मोन आपली झोप आणि जागण्याची प्रोसेस नियंत्रित करतात. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर बॉडी ग्रोथ हार्मोन रिलीज करते, ज्याने शरीराला आराम मिळण्यास मदत मिळते. पण जेव्हा कामात बिझी असल्याने महिला व्यवस्थित झोप घेऊ शकत नाहीत, तेव्हा शरीराला आराम मिळण्याची ही प्रोसेस बिघडते. ज्यामुळे वजन वाढू लागतं.
कसं कराल कंट्रोल?
रात्री उशीरा काहीही खाणे टाळावे. तसेच चांगली आणि पुरेशी झोप घ्यावी. रूममध्ये अंधार असेल तर झोप चांगली होईल. शक्य असेल तर चांगली झोप घेण्यासाठी मोबाइल स्विच ऑफ करा.
प्रोजेस्टेरॉन हार्मोन
शरीरात असलेले प्रोजेस्टेरॉन हार्मोन गर्भनिरोधक गोळ्या आणि मेनोपॉजमुळे कमी होऊ शकतात. या कारणाने सुद्धा वजन वाढू शकतं. ही समस्या दूर करण्यासाठी रोज एक्सरसाइज करा. तणाव दूर करा आणि काही वेळ मेडिटेशनची सवय लावा.
इंन्सुलिन हार्मोन
जर तुम्ही अधिक प्रमाणात आर्टिफिशिअल स्वीट ड्रिंक्स, अल्कोहोलचं सेवन करत असाल तर याने तुमची इम्यून सिस्टीम कमजोर होऊ शकते. आणि महिलांमध्ये वजन वाढण्याचा व टाइप २ डायबिटीसचा धोकाही वाढतो. इन्सुलिन एक असा हार्मोन आहे जो सेल्समध्ये ग्लूकोजचा वापर एनर्जीच्या रूपात करण्यात किंवा त्यांना फॅटच्या रूपात स्टोर करण्यात मदत करतो.
कसं कराल कंट्रोल?
रात्री उशीर काही खाणं टाळावे. अल्कोहोल, आर्टिफिशिअल स्वीट ड्रिंक्स सेवन करणं सुद्धा टाळा. आहारात नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. तसेच दररोज कमीत कमी चार लिटर पाणी आवर्जून प्यावं.
लेप्टिन हार्मोन
ज्या महिला कॅंडीज, चॉकलेट्स आणि फ्रक्टोज असलेल्या फळांचं अधिक सेवन करतात, त्यांच्यात फ्रक्टोज फॅट बदलतात. आणि हेच फॅट हळूहळू महिलांचं लिव्हल, पोट आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात जमा होऊ लागतं. जर तुम्ही फ्रक्टोज असलेल्या पदार्थांचं अधिक सेवन कराल तर जास्तीत जास्त लेप्टिन हार्मोन सिक्रीट होऊ लागेल आणि तुमचा मेंदू जास्त खाणं बंद करण्याचा संकेत देणं बंद करेल, ज्यमुळे तुमचं वजन वाढू लागेल.
कसं कराल कंट्रोल?
फार जास्त कॅंडी किंवा चॉकलेट खाऊ नये. तसेच अशा फळांचंही सेवन कमी करा ज्यात फ्रक्टोज कमी असेल. यात डेट्स, आंबा, द्राक्ष या फळांचा समावेश होतो.
कोर्टिसोल हार्मोन
जेव्हा महिला कोणत्याही कारणाने टेन्शन किंवा स्ट्रेसमध्ये असतात, तेव्हा ऐड्रिनल ग्लॅंडमधून कोर्टिसोल हार्मोन रिलीज होतात. याचं मुख्य काम ब्लड शुगर लेव्हल वाढवून इम्यून सिस्टीम कमी करण्यासोबतच तणाव कमी करणे हे आहे. जेव्हा हे हार्मोन असंतुलित होतात, तेव्हा वजन वाढणं सुरू होतं.
कसं कराल कंट्रोल?
या हर्मोनचं संतुलन कायम ठेवण्यासाठी किमान ७ तासांची झोप गरजेची आहे. तसेच रोज योगाभ्यास किंवा मेडिटेशनही करू शकता. याने तुमचा तणाव कमी होण्यास मदत मिळेल. त्यासोबतच फार जास्त तळलेले पदार्थ आणि अल्कोहोलचं सेवनही टाळा.