शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

परफेक्ट फिगर हवी आहे? मग हे करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 12:15 IST

गंभीर समस्या म्हणजे पोट सुटणे, यामुळे शारीरिक रचनाच बिघडल्यासारखी वाटते.

मुंबई - बदलती जीवनशैली, जीवघेणी स्पर्धा, लठ्ठपणा, वेळी-अवेळी खाण्यामुळे पोट-कंबरेवरील वाढणारी चरबी यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. यातील सर्वांचीच गंभीर समस्या म्हणजे पोट सुटणे, यामुळे शारीरिक रचनाच बिघडल्यासारखी वाटते. म्हणजेच फिगरची 'ऐसी की तैसी' झाल्यासारखं दिसतं. मग मेन्टेन राहण्यासाठी आपण जीम, कसरती, व्यायाम, डाएट इत्यादी गोष्टींकडे आपला मोर्चा वळवतो. मात्र शारीरिक लवचिकता वाढावी आणि कोणत्याही दुष्परिणामाविना वजन घटावे, असं वाटत असल्यास योगाभ्यास करावा. 

कोणत्याही वयात पोटाचा घेर कमी करण्यासाठी योगासने एक उत्तम उपाय ठरतील. वजन कमी करण्यासाठी व फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी आपण पाच योगासनांबाबत माहिती जाणून घेऊया 

1. भुजंगासन -भुजंगासनाचा अभ्यास केल्यानं कंबर व पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. खांदेदेखील मजबूत होतात. पाठीच्या कण्याच्या आरोग्याच्या दृष्टीनेदेखील हे एक उत्तम आसन आहे. मात्र, मानदुखी, पाठदुखी, हर्निया असल्यास भुंजगासन करू नये.  भुजंगासनामुळे पाठीच्या कण्यातील रक्ताभिसरण सुधारते, पाठीच्या कण्याचा लवचिकपणा वाढतो आणि श्वसन, पचन आणि उत्सर्जन क्रिया सुधारते.

2. पश्चिमोत्तानासन -पश्चिमोत्तानासन  पोटावरील ताण येत असल्यानं पोटाचा घेर वाढला असल्यास तो कमी होतो. मात्र, नियमित अभ्यासानंच शारीरिक बदल जाणवतील.  हे आसन केल्याने तुम्ही आजारापासून तर दूर राहालच तसेच तुमचे शरीर लवचिक राहील. शिवाय, शरीराच्या पाठीकडील बाजूचे स्नायू, विशेषत: मांडीच्या मागील आणि कमरेचे स्नायू जास्त लवचिक बनवतात. पाठीच्या कण्यावरील ताणामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारतं व मणक्यांतून निघणा-या नाड्या (मज्जातंतू) अधिक कार्यक्षम बनतात. पचनक्षमताही सुधारते.

3. सेतुबंधासन -प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही गुडघे वाकवून शरीराच्या जवळ उभे करावेत. दोन्ही पायांमध्ये साधारण खांद्याएवढे अंतर असावे. दोन्ही हात शरीरालगत असावेत. पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत पोट व कंबर वरती उचलावे. श्वसन संथ सुरु ठेवावे. काही सेकंद या आसनस्थितीत राहिल्यानंतर, हळुवारपणे पुन्हा मूळस्थितीत यावे. (मणक्याचे विकार असणा-या व्यक्तिंनी हे आसन मार्गदर्शनाशिवाय करु नये.)

4. धनुरासन - धनुरासनामुळे शरीराचे स्नायू दृढ आणि लवचिक होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पोट, पाठ, मान, छाती, हात, पाय यांसारख्या अवयवांना एकचवेळी उत्तम आणि योग्य ताणाची स्थिती मिळाल्याने, शरीराला होणारा लाभ वृद्धिंगत होतो. तसंच पाठीचा वक्रदोष नष्ट होतो. कमरेची आणि मानेची दुखणी कमी होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटांचे स्नायू खेचले गेल्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते.  

5. चक्‍की चलनासन - चक्‍की चलनासन पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या योगात वजन कमी करण्यात मोठी मदत होते.  

टॅग्स :YogaयोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य