वायरमनचा विषबाधेने मृत्यू पाळधीनजीक सापडला मृतदेह : सकाळपासून होते घरून बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 22:25 IST2016-08-05T22:25:10+5:302016-08-05T22:25:10+5:30
जळगाव : आयोध्यानगरातील रहिवासी व धरणगाव येथे वायरमन म्हणून कार्यरत असलेले मोहन बाबुराव वाघ (४३) यांचा शुक्रवारी संध्याकाळी पाळधीनजीक मृतदेह आढळून आला. विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

वायरमनचा विषबाधेने मृत्यू पाळधीनजीक सापडला मृतदेह : सकाळपासून होते घरून बेपत्ता
ज गाव : आयोध्यानगरातील रहिवासी व धरणगाव येथे वायरमन म्हणून कार्यरत असलेले मोहन बाबुराव वाघ (४३) यांचा शुक्रवारी संध्याकाळी पाळधीनजीक मृतदेह आढळून आला. विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. वावडदा येथील मूळ रहिवासी असलेले मोहन वाघ हे आयोध्यानगरात राहतात. ते वीज वितरण कंपनीत धरणगाव येथे कार्यरत असून गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने रुग्णालयात दाखल होते. नुकतीच त्यांची रुग्णालयातून सुी झाली होती. कार्यालयात जायचे सांगून गेले घरून...शुक्रवारी सकाळी कार्यालयात जाऊन येतो असे सांगून ते घरून गेले होते. घरी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर ते परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला असता महामार्गावर पाळधीजवळ एका पुलानजीक त्यांची दुचाकी दिसली. तेथे आजूबाजूला पाहिले असता ते जमिनीवर पडलेले आढळले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी त्यांनी जमिनीवर तळमळत पाय घासल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात आले. नातेवाईकांचा आक्रोश...मोहन वाघ यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. त्यांना काय ताण होता, त्यांनी असे का केले असा शोक नातेवाईक करीत होते. मयत वाघ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.