शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

फिट्स येतात म्हणून 30 वर्षं घेत होता औषध, सत्य कळताच सगळेच चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 4:26 PM

डॉक्टारांनी त्याला फिट येण्याची समस्या असल्याचं सांगितलं आणि त्यासंबंधी औषधांचं तो सेवन करत होता. पण नंतर जे सत्य समोर आलं त्याने सगळेच हैराण झाले.

चीनमधून नेहमीच अशा काही घटना ऐकायला मिळतात की, आश्चर्याचा धक्काच बसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्ती गेल्या ३० वर्षांपासून डोकेदुखीची आणि चक्कर येण्याची समस्या होती. डॉक्टारांनी त्याला फिट येण्याची समस्या असल्याचं सांगितलं आणि त्यासंबंधी औषधांचं तो सेवन करत होता. पण नंतर जे सत्य समोर आलं त्याने सगळेच हैराण झाले.

asiaone.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, गुआंगदोंग प्रांतातील डोंगराळ गावात राहणाऱ्या ५९ वर्षीय झांग यांना सर्वातआधी १९८९ मध्ये असह्य डोकेदुखी आणि चक्कर येण्याची समस्या सुरू झाली. त्यावेळी ते त्यांच्या मित्रांसोबत बसून गेम खेळत होते. अचानक त्यांच्या खांद्यामध्ये आणि पायांमध्ये वेदना सुरू झाल्या. त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले.

(Image Credit : sleepbubble.com) (

बेशुद्ध झाल्यावर झांग यांना ग्वांगझू येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथे डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना फिट येण्याची समस्या आहे. त्यानुसार त्यांना औषधे दिली. पण झांग यांची डोकेदुखी, चक्कर येणं, बेशुद्ध होणं आणि शरीरात झिणझिण्या येण्याची समस्या काही दूर झाली नाही.

(Image Credit : scmp.com)

मात्र, २०१५ मध्ये त्यांची समस्या फार जास्त वाढली. त्यावेळी गावात आग लागली होती. तेव्हापासून त्यांची डोकेदुखीची समस्या अधिक बळावली. तसेच जास्त वेळा चक्कर येऊन बेशुद्धही होऊ लागले होते.

(Image Credit : asiaone.com) (झांग यांच्या मेंदूतून काढलेला किडा)

नंतर ते पुन्हा एकदा डॉक्टरकडे गेले. पण डॉक्टरांनी त्यांना पुन्हा तेच फिट येण्याचं कारण सांगितलं. मात्र, झांग हे दुसऱ्या डॉक्टरकडे गेले. त्यांनी झांग यांचा एमआरआय स्कॅन केला. तेव्हा त्यांचं डोकेदुखीचं खरं कारण समोर आलं. झांग यांच्या मेंदूत एक १० सेंटीमीटर लांब किडा होता. हा किडा सर्जरी करून काढण्यात आला. यात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे हा किडा गेल्या ३० वर्षापासून जिवंत होता. हे पाहून डॉक्टरही चक्रावून गेले होते.

(Image Credit : Pixabay)

झांग यांचं ऑपरेशन करणारे डॉक्टर यान जुईकियांग यांच्यानुसार, नदीचं पाणी प्यायल्याने किंवा अर्धा शिजलेला झिंगा खाल्ल्याने असं इन्फेक्शन होऊ शकतं. जसं झांग यांना झालं होतं. झांग हे गावात नदीचंच पाणी पित होते आणि झिंगे खूप खात होते. डॉक्टरांचं मत आहे की, यामुळे झांग यांना डोकेदुखीची समस्या झाली होती.

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेHealthआरोग्य