शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

४ दिवसांनी जगातील पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन; लसीकरणाला सुरूवात कधी होणार, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 09:59 IST

CoronaVirus News and Latest Updates : भारत, ब्रिटेन, अमेरिका, इस्त्राईल चीन आणि इतर देश कोरोनाची लस तयार करण्यात पुढे आहेत.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण जगभरातील देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कोरोना विषाणूंच्या लसीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या लसीबाबत जगभरातील २०० पेक्षा जास्त प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. ज्यातील २१ पेक्षा जास्त देशात लसीचे वैद्यकिय परिक्षण सुरू झाले आहे. भारत, ब्रिटेन, अमेरिका, इस्त्राईल चीन आणि इतर देश कोरोनाची लस तयार करण्यात पुढे आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी कोरोनाच्या लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाशी जोडलेल्या गमलेया रिसर्च इंस्टीट्यूट द्वारे निर्माण करण्यात आलेल्या लसीचे चार दिवसांनी रिजस्ट्रेशन होणार आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन होणारी ही जगातील पहिली लस असेल. सर्वकाही व्यवस्थित पार पडल्यास ही लस लवकरच उपलब्ध होईल. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाचे आरोग्यमंत्री मिखायल मुराश्को यांनी सांगितले की, रशियात कोरोनाच्या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

 ऑक्टोबर महिन्यापासूनच देशात व्यापक स्वरुपात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. या लसीकरणासाठी लागणारा खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे. तसंच १२ ऑगस्टला या लसीचे रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. मंत्री  ग्रिदनेव यांनी शुक्रवारी ऊफा शहरात सांगितले की यावेळी लसीच्या अंतिम टप्प्यातील परिक्षण सुरू होत असून हे परिक्षण महत्वपूर्ण आहे. देशाची लोकसंख्या लक्षात  घेता मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाणार आहे.

ही लस तयार  झाल्यानंतर लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारीवर्गाला प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य नागरिकांसाठी लस उपलब्ध होईल. वरिष्ठ नागरिक आणि आरोग्य सेवेतील कामगारांना लस सगळ्यात आधी देण्यात येणार आहे.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चाचणीदरम्यान या लसीचे सकारत्मक परिणाम दिसून आले आहेत. ऑक्टोबरमध्ये देशभरात लसीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. 

दरम्यान इस्त्राईलने गुरुवारी दावा केला आहे की, त्यांनी कोरोना व्हायरसशी लढण्याासाठी प्रभावी ठरत असणारी एक चमत्कारीक लस तयार केली आहे. तसंच या लसीच्या मानवी परिक्षणासाठी आता सरकारकडून परवानगी घेतली जाणार आहे. शरदाच्या सुट्ट्या संपल्यानंतर या औषधाचे परिक्षण करण्यात येणार आहे. इस्त्राईलचे सुरक्षामंत्री बेनी गांट्ज यांनी इस्त्राईल इंस्‍टिट्यूट ऑफ बॉयोलॉजिकल रिसर्चचा दौराकरून याबाबत माहिती मिळवली आहे.

इंस्टिट्यूटचे प्रमुख प्राध्यापक शॅमुअल शपिरा यांनी इस्त्रायली लसीबाबत माहिती दिलीआहे. इज्राईलचे सुरक्षामंत्री तसंच प्रधानमंत्री कार्यालयानं या लसीबाबत एक प्रभावी आणि परिणामकारक लस  तयार केल्याचे सांगितले आहे. माणसांवर  या लसीचे परिक्षण लवकरच सुरू होणार आहे. शापीरा यांनी सांगितले की आम्हाला या लसीवर खूप अभिमान आहे. या लसीचा वापर कधीपर्यंत सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

हे पण वाचा-

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार

मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याrussiaरशिया