शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

World Malaria Day : भर उन्हाळ्यातही चावताय डास? अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:59 IST

World Malaria Day : मुंबईत कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरड्या हवामानाच्या तुलनेत पावसाळ्यात डासांची उत्पत्ती अधिक होत असली तरी उन्हाळ्यातही अशा प्रकारचे दिसून येतात.

डॉ. विक्रांत शहा, सल्लागार फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि संसर्ग रोग विशेषज्ञ, झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चेंबूर 

मुंबईत कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरड्याहवामानाच्या तुलनेत पावसाळ्यात डासांची उत्पत्ती अधिक होत असली तरी उन्हाळ्यातही अशा प्रकारचे दिसून येतात. काही प्रतिबंधात्मक उपाय जसे की पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, डासांपासूनबचाव करणे,डास प्रतिबंधात्मक फवारणी आणि साचलेल्या पाण्याचा नायनाट असे काही उपाय आपल्याला मलेरिया सारख्या आजाराला प्रतिंबध करण्यास नक्कीच फायदेशीर ठरतात.

डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. संक्रमित मादी अॅनोफिलीस डासांच्या चाव्याव्दारे लोकांमध्ये पसरणाऱ्या प्लास्मोडियम परजीवीमुळे एखाद्याला मलेरिया होऊ शकतो. गरोदर स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांना मलेरियाचा अधिक धोका असतो. मलेरिया असलेल्या रुग्णांमध्ये ताप, थंडी वाजून येणे आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात. 

उपचार न केल्यास, मलेरियामुळे मृत्यू होऊ शकतो किंवा अशक्तपणा, यकृत निकामी होणे,  श्वसनासंबंधी त्रास , मूत्रपिंड निकामी होणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे आणि निर्जलीकरण यांसारख्या गुंतागुंत होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान मलेरियामुळे गर्भपात, मृत बाळ जन्माला येणे आणि अकाली जन्म होण्याचा धोका असतो.

डॉक्टरांनी सांगितलेली मलेरियाविरोधी औषधे घेऊन मलेरियावर उपचार करता येतात. घराबाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे, घट्ट आणि हलक्या रंगाचे कपडे घाला. डास प्रतिबंधात्मक फवारणी करणे,  झोपताना मच्छरदाणी वापरणे, उकळलेले पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे उपयुक्त ठरू शकते .

तुम्ही घराबाहेर असताना मच्छर प्रतिबंधक औषधांचा वापर करा आणि घराभोवती स्वच्छता राखा, कुंड्यांमधील पाण्याचा वेळोवेळी निचरा करा, पाणी साचू देऊ नका, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा आणि तज्ञांनी सुचविल्याप्रमाणे रोगप्रतिबंधक उपाय (प्रतिबंधात्मक उपाय) वापरा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य