वैभव आणि प्रार्थना करणार नाही सोबत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 16:26 IST2016-03-29T23:26:39+5:302016-03-29T16:26:39+5:30
जालिंदर कुंभार दिग्दर्शित रेडिमिक्स या चित्रपटातून हॅटट्रिक करणार आहे.पण या जोडीचा २०१६ यावर्षीचा हा शेवटचा चित्रपट असल्याचे खुद्द वैभव तत्ववादीने याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.

वैभव आणि प्रार्थना करणार नाही सोबत काम
म ाठी इंडस्ट्रीमध्ये वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे या जोडीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांनी मनात स्थान निर्माण केले आहे. कॉफी अॅण्ड बरचं काही, मि. अॅण्ड मिसेस सदाचारी या हिट चित्रपटानंतर या जोडीला कित्येक प्रेक्षकांनी मराठी इंडस्ट्रीचे गोविंदा आणि करिश्मा ही उपमा देखील दिली आहे. मराठी इंडस्ट्रीची ही हिट जोडी आता, जालिंदर कुंभार दिग्दर्शित रेडिमिक्स या चित्रपटातून हॅटट्रिक करणार आहे.पण या जोडीचा २०१६ यावर्षीचा हा शेवटचा चित्रपट असल्याचे खुद्द वैभव तत्ववादीने याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. वैभव म्हणाला, मी आणि प्रार्थना ठरविले आहे की, रेडिमिक्स हा चित्रपट या वर्षीचा आपला शेवटचा चित्रपट असणार आहे. यावर्षी रेडिमिक्सनंतर कोणताही चित्रपट सोबत न करता थेट २०१७ मध्ये पुन्हा एकत्र चित्रपट कराण्याची संधी मिळाली तर तो करायचा. रेडिमिक्स हे चित्रपटाचे नाव अजून ही फायनल नसल्याचे देखील वैभवने यावेळी सांगितले.