कशाला करायची काळजी? का कुढत राहायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:26 PM2018-01-04T16:26:20+5:302018-01-04T16:27:34+5:30

स्वत:शीच चरफडत राहण्यापेक्षा करा की हा सोप्पा उपाय?

 Why to worry? | कशाला करायची काळजी? का कुढत राहायचं?

कशाला करायची काळजी? का कुढत राहायचं?

ठळक मुद्देटेन्शन घालवायचा उत्तम उपाय म्हणजे संगिताच्या साथीनं ध्यान करायचं.तुमचं टेन्शन त्यामुळे कमी होणारच.परदेशात नुकत्याच झालेल्या संशोधनातून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

- मयूर पठाडे

सतत काळजी, काळजी, काळजी.. किती गोष्टींची काळजी करायची? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काळजीनं आपण पोखरलेलं असतो. त्यावर मात कशी करायची हेच आपल्याला सुचत नाही. मग आपण कुढत राहतो, मनातल्या मनात चरफडत राहतो. बºयाचदा हे चरफडणं आपल्या शरीरावर, मनावर परिणाम करतं. करतंच. अनेकदा तर त्याचं गंभीर आणि शरीरिक दुखण्यातही रुपांतर होतं. मग या काळजीतून बाहेर पडायचं तरी कसं? पुन्हा हसरं, खेळतं, आनंदी जीवन कसं जगायचं? खरं तर कायम आनंदी कसं राहायचं?
गहन वाटणारा हा प्रश्न, पण त्याचं उत्तर खूपच सोपं आहे. नुसतं सोपंच नाही, तर प्रत्येकाला ते सहजशक्य आहे.
वेस्ट व्हर्जिनिआ युनिव्हर्सिटीच्या काही शास्त्रज्ञांनी नुकताच एक प्रयोग केला. काय केलं त्यांनी?
ज्यांना ज्यांना कुठल्या ना कुठल्या काळजीनं घेरलेलं होतं, त्यांना त्यांच्या खोलीत मंद आवाजात सुदिंग म्युझिक सुरू करून श्वासाकडे लक्ष केंद्रित करायला सांगितलं. ध्यान करायला सांगितलं.
खरं तर आपल्या ऋषीमुनींनी खूप आधीच सांगून ठेवलेला हा उपाय. पण नुकत्याच झालेल्या या प्रयोगातून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की तुम्हाला कुठलीही चिंता, काळजी, टेन्शन असेल तर सुदिंग म्युझिकच्या सोबतीनं ध्यान करा. तुमची चिंता कुठल्या कुठे पळून जाईल.
या प्रयोगात शास्त्रज्ञांनी तीन महिने एका गटावर प्रयोग केला. त्यांच्या लक्षात आलं, या लोकांचं या कालावधीतलं टेन्शन तब्बल ४० टक्क्यांनी कमी झालं!

Web Title:  Why to worry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.