(Image Credit : Cook's Illustrated)
कोलेस्ट्रॉलची काळजी करणाऱ्यांना लोकांना वाटत असतं की, ते जे काही खातात त्यात तेलाचं प्रमाण कमी असावं. त्यामुळे अनेकजण नॉनस्टिक भांड्यांचा वापर करतात. या भांड्यांमध्ये पदार्थ तयार केल्यास तेल कमी लागतं असं मानलं जातं. या भांड्यांमध्ये तेल कमी वापरूनही पदार्थ चिकटत नाहीत. त्यामुळे यांना नॉनस्टिक म्हटलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, कोलेस्ट्रॉलपासून बचाव करणारी नॉनस्टिक भांडी किडनी आणि फुप्फुसांसाठी नुकसानकारक ठरू शकते.
आरोग्याप्रति जागरूक असलेले जास्तीत जास्त लोक आता जेवण तयार करण्यासाठी नॉनस्टिक भांड्यांचा वापर करतात. लोकांचा समज आहे की, या भांड्यांमध्ये तेल कमी लागतं आणि पदार्थ याला चिकटत नाहीत. त्यामुळे तुम्हीही अशी भांडी वापरत असाल. पण या भांड्यांच्या वापरामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारासोबतच लंग्स् डॅमेज होण्याचाही धोका असतो.
का आहे आरोग्यासाठी हानिकारक?
नॉनस्टिक भांड्यांवर टेफ्लॉनचं कोटिंग केलं जातं, ज्याला पॉलीटेट्राफ्लूरोएथिलिन (PTFE) म्हटलं जातं. टेफ्लॉनचं निर्माण PFOA (perfluorooctanoic acid) ने केलं जातं. हा एक विषारी पदार्थ आहे. याने होणारे नुकसान समोर आल्यानंतर आता नॉनस्टिक भांड्यांमध्य GenX चा वापर केला जातो आहे. याच कारणामुळे आजकाल नॉनस्टिक भांड्यांवर PFOA फ्रि असं लिहिलेलं असतं. पण याच्याऐवजी इतर काही मेटरिअलचा वापर केला जात असेल तर त्याचेही आरोग्याला नुकसान होऊ शकतात.
काय आहे टेफ्लॉन?
टेफ्लॉन हे एक सेफ कंपाउंड आहे जे आरोग्यासाठी थेटपणे हानिकारक नाही. पण ३०० डिग्री सेल्सिअस तापमानावर नॉनस्टिक भांड्यांवर लावलेलं टेफ्लॉनचं कोटिंग वितळू लागतं, ज्यामुळे हवेमध्ये प्रदूषित केमिकल मिश्रित होतात.
काय आहे धोका?
हा विषारी धूर नाकात गेल्यास पॉलीमर फ्यूम फिव्हल किंवा टेफ्लॉन फ्लू होऊ शकतो. यात थंडी वाजणे, ताप येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी यांसारखी सामान्य लक्षणे दिसतात. काही रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, टेफ्लॉन जास्त गरम झाल्याने लंग कॅन्सरही होऊ शकतो.
'या' गोष्टींची घ्या काळजी...
१) नॉनस्टिक पॅनला प्री-हीट करू नका. पॅन गरम करण्याआधी त्यात पदार्थ किंवा कोणताही तरल पदार्थ जसे की, पाणी टाका. जेणेकरून टेफ्लॉन कोटिंग तुटून धोकादायक फ्यूम तयार होऊ नये. तसेच जास्त तापमानावर पदार्थ तयार करू नका.
२) नॉनस्टिक भांड्यांमध्ये जेवण तयार करताना नेहमी लाकडाच्या चमच्याचा वापर करावा. धातुच्या चमच्यांचा वापर केल्याने टेफ्लॉन कोटिंगचं नुकसान होऊ शकतं.
३) जेव्हा नॉनस्टिक भांडी जुनी होत असेल आणि त्यांचं टेफ्लॉन कोटिंग निघू लागलं असेल तर या भांड्यांचा वापर करणे बंद करा.