शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सकाळी झोपेतून उठताच फोन चेक करणं किती घातक?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:04 AM

मोबाइल फोनचा वापर आताच्या लाइफस्टाईलमधे किती केला जातो, हे काही वेगळं सांगायला नको. अनेकजण सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल फोन चेक करतात.

(Image Credit : blogs.opera.com)

मोबाइल फोनचा वापर आताच्या लाइफस्टाईलमधे किती केला जातो, हे काही वेगळं सांगायला नको. अनेकजण सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल फोन चेक करतात. पण खरंच सकाळी झोपेतून उठल्या बरोबर मोबाइल चेक करणं किती योग्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडायला हवा. कारण मोबाइल फोनची ही सवय एक मोठी चिंता ठरत आहे. एका रिसर्चनुसार, सकाळी उठल्यावर पहिल्या १५ मिनिटात ५ लोकांपैकी ४ लोक मोबाइल फोन चेक करतात. जर तुम्हीही असं करत असाल तर याच्या नुकसानाबाबत तुम्हाला माहीत असायला हवं.

मेंदू आणि मनाच्या शांतीवर प्रभाव

(Image Credit : mentalfloss.com)

जे लोक सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल चेक करत असतील तर याचा त्यांच्या मेंदूवर थेट परिणाम होतो. याने मनाची शांतता सुद्धा बाधित होते. व्यक्ती मोबाइल फोन स्क्रोलसोबत मेंदूवरही जोर देतो यानेही असं होत असल्याचं एक्सपर्ट सांगतात. कालच्या आणि आजच्या शेड्युलवर मेंदू वेगवेगळे व्यवहार करतो. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टचा देखील मेंदू आणि मनावर प्रभाव पडतो. सकाळी उठताच मोबाइल चेक केल्याने तणाव आणि चिंता वाढते. असं ई-मेल, रिमाइंडर आणि इन्स्टाग्राम पोस्टसहीत इतरही सोशल साइट्सवरील मित्रांच्या पोस्टमुळेही होऊ शकतं. 

स्वभावात बदल

जर तुम्ही सकाळी उठताच मोबाइल फोन चेक करत असाल तर तुमच्या स्वभावातही बदल येऊ शकतो. काही लोकांमध्ये चिडचिडपणाचं हे कारण असतं. काही लोकांना FOMO नावाची समस्याही होऊ लागते. याचं मुख्य लक्षण आपण कुठेतरी, काहीतरी हरवत चालल्याची भिती हे असतं. ही एक भावनात्मक गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा राग किंवा संताप येणे यांसारख्या समस्याही होतात.

खाण्याच्या सवयीत बदल

अनेकदा असं पाहिलं जातं की, सकाळी उठल्यावर लगेच जे लोक फोन चेक करतात, त्यांच्या खाण्याच्या व्यवहारातही बदल होऊ लागतो. फोन चेक केल्याने या लोकांचा व्यवहार इतर लोकांच्या तुलनेत वेगळा असतो. सकाळी उठल्यावर हे लोक फिरायला जातात तेव्हा त्यांना अधिक थकवा जाणवतो.

फोकस न करता येणे 

जे लोक सकाळी उठून मोबाइल चेक करतात, त्यांचं लक्ष केंद्रीत राहत नाही. जास्तवेळ लोक फोनमधे गुंतलेले असतात आणि आपल्या कामावर लक्ष देत नाहीत. त्यांचं कामात लक्षही लागत नाही. यामुळेच त्यांची कार्यक्षमताही कमी होऊ लागते.

कशी बदलाल ही सवय?

सकाळी उठल्यानंतर फोन चेक करण्याऐवजी इतर गरजेची कामं करावीत. जसे तुम्ही कोमट पाणी सेवन करून फ्रेश होण्यासाठी तयारी करू शकतात.

जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर सकाळी उठून मेडिटेशन आणि योगाभ्यास करा.

परिवारातील सदस्यांसोबत चहा घ्या, त्यांच्यासोबत गप्पा करा.

रात्री झोपताना फोन सायलेन्ट करा किंवा इंटरनेट बंद करा.

रोज सकाळी तुमची सगळी तयारी केल्यानंतर फोन हाती घ्यावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यMobileमोबाइल