शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

तरूणांना चालता-फिरता अचानक का येतोय हार्ट अटॅक? जाणून घ्या यामागील कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:47 IST

आजच्या धकाधकीच्या युगात लोकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Heart Attack Causes : आजच्या धकाधकीच्या युगात लोकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. शारीरिक व्‍यायामाचा अभाव, उच्‍च रक्‍तदाब व कोलेस्‍ट्रॉल, लठ्ठपणा आणि मादक पदार्थांच्या व्यसनामुळे हार्ट संबंधित आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. माहितीनूसार ,२०२३ या वर्षामध्ये भारतात ह्रदयरोगाचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्यांचे संख्येत तुलनेने वाढ झालीय. ह्रदरोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे काही सवयी कारणे ठरतात, ज्या त्वरित बदलणं गरजेचं आहे. 

सध्या ह्रदयरोगाची समस्या ही गंभीर बनत चालली आहे. भारतात मागील काही वर्षांमध्ये ह्रदयाचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्यांमध्ये १२ ते  ४५ वयोगटातील लोकांना जीव गमावावा लागलाय. तरुणांना नाचताना किंवा फिरताना अचानक ह्रदयविकाराचा झटका येतो आणि त्यांचा मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली, वाचली असतीलच. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ही समस्या जगभरात मृत्यूचे सर्वात मोठे बनत चालली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे १ कोटी ८० लाख लोक आपला जीव गमावत आहेत.

ह्रदयरोगाची समस्या का वाढते :

अलिकडेच ह्रदयरोगाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कोविड-१९ महामारी नंतर ह्रदयाशी संबंधित आजार प्रचंड वाढले. पाहायला गेल्यास कोरोनानंतर तरुणांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण तुफान वाढलं आहे. मागील काही वर्षांमध्ये भारतात या जीवघेण्या आजाराने डोकं वर काढलं आहे. 

आरोग्यतज्ञांनी सांगितले कारण:

मागील तीन वर्षांचा आढावा घेतल्यास कोविड -१९ नंतर भारतात ह्रदयरोगाने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत प्रंचड वाढ झालेय. एनसीआरबीने जारी केलेल्या आकडेवारीनूसार भारतामध्ये २०२२ या वर्षी ह्रदरोगाचा धोका वाढला आहे. व्‍यायामाचा अभाव, उच्‍च रक्‍तदाब व कोलेस्‍ट्रॉल, लठ्ठपणामुळे हा आजार अधिक बळावतोय.

आकडेवारीत वाढ :

एनसीआरबीने दिलेल्या माहितीनूसार भारतामध्ये जवळपास  ३२,४५७  लोकांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झालेल्या नोंदी आहेत. शिवाय २०२३ मध्ये ही आकडेवारी २८,४१३ इतकी आहे.  या आजाराने सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

ह्रदयरोगांपासून बचावाकरिता काय करावे- 

डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार, ह्दयरोगाच्या वाढत्या समस्येपासून सूटका करण्यासाठी काही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.

१.मद्यपान किंवा धुम्रपान करु नये, असा सल्ला आरोग्यतज्ञ देतात. २.आपल्या आहार पोषक, संतुलित असणे गरजेचे आहे.३.नेहमी ताजेतवाणे राहण्यासाठी व्यायाम करण्यास सांगितले जाते. ४.डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार, वजन नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ५.कोलेस्ट्रॉल, मधुमेह तसेच उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स