मेरी आवाजही पेहचान है, गर याद रहें....दिवंगत लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजातील या ओळी कधी कुणी विसरणार नाही. कारण आपण असलो नसलो तरी आवाज आपली ओळख असतो. पुरूष आणि महिलांच्या आवाजात बराच फरक असतो. म्हणजे पुरूषांचा आवाज जरा जड आणि महिलांचा आवाज जरा बारीक असतो. पण आपण असंही पाहिलं असेल की, काही तरूण किंवा पुरूषांचा आवाज हा महिलांसारखा बारीक असतो. यावरून अनेकदा त्यांची खिल्ली देखील उडवली जाते. पण काही पुरूषांचा आवाज हा महिलांसारखा बारीक का असतो? यावर डॉ. शिव कुमार सरीन यांनी माहिती दिलीये.
वय १८, कंबर ४४ इंच...
डॉ. सरीन यांनी त्यांच्या पुस्तकात माहिती दिलीये की, चंडीगढमधील एक व्यक्ती त्यांच्याकडे गॉल ब्लॅडरच्या उपचारासाठी आली होती आणि त्यांच्यासोबत त्यांचा १८ वर्षीय मुलगा अमरेंद्र सुद्धा आला होता. अमरेंद्रचं वजन फार जास्त होतं आणि त्याची कंबर जवळपास ४४ इंच होती. त्याची उंची चांगली होती आणि शरीरही जड होतं. पण त्याचा आवाज बारीक होता. जो त्याच्या शरीर रचनेसोबत मेळ खात नव्हता. १८ वर्षांचा असताना सुद्धा अमरेंद्रचा आवाज खूप बारीक आणि महिलांसारखा होता. त्याच्या चेहऱ्यावर दाढी किंवा मिशी नव्हती. हा संकेत होता की, त्याची सेकेंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्सची ग्रोथ वेळेवर झाली नव्हती. डॉक्टरांनी
जेव्हा अमरेंद्रची टेस्ट केली तेव्हा त्याचा बीएमआय ३७ होता आणि तो ग्रेड २ फॅटी लिव्हरने ग्रस्त होता. सोबतच त्याची सीरम टेस्टोस्टेरॉन लेव्हल चेक करण्यात आली. पुरूषांममध्ये याची लेव्हल सामान्यपणे २७० ते १०७० एनजी/डीएल असते. पण अमरेंद्रमध्ये ही लेव्हल केवळ ९२ एनडी/डीएल होती.
डॉ. सरीन यांच्यानुसार, ओबेसिटीमुळे टेस्टोस्टेरॉन लेव्हल कमी होते. फॅट सेल्स पुरूष हार्मोन्सना फीमेल हार्मोनमध्ये बदलू लागतात. रिसर्च सांगतो की, कंबरेचा घेर जर ४ इंच वाढतो तेव्हा टेस्टोस्टेरॉन कमी होण्याची शक्यता ७५ टक्के वाढते.
तरूणांचा आवाज बारीक असण्याचं वैज्ञानिक कारण
द जर्नल ऑफ क्लीनिकल एंडोक्रिनोलॉजी अॅन्ड मेटाबॉलिज्म आणि ह्यूमन रिप्रोडक्शनच्या रिसर्चनुसार, पुरूषांचा आवाज जड असणं हे पूर्णपणे टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर अवलंबून असतं. किशोरावस्थेत हे हार्मोन घशातील व्हॉईस बॉक्सला वाढवून व्होकल कॉर्ड्सना जाड करतात. पण जेव्हा शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा हे फॅट केवळ चरबीसारखं नाही तर अॅक्टिव अवयवासारखं काम करू लागतं. यातील एरोमाटेज एंझाइम पुरूष हार्मोन टेस्टोस्टेरॉनला महिला हार्मोन अॅस्ट्रोजनमध्ये बदलू लागतं.
वैज्ञानिक सांगतात की, जेव्हा अॅस्ट्रोजन वाढतं, तेव्हा व्हॉईस बॉक्सची वाढ थांबते आणि आवाज पुरूषी होण्यापेक्षा बारीक होतो. त्याशिवाय लठ्ठपणा मेंदूला मिळणाऱ्या हायपोथॅलेमसला मिळणारे संकेत कमजोर होतात. ज्यामुळे टेस्टोस्टेरॉनचं उत्पादन कमी होतं.
टेस्टोस्टेरॉन कमी झाले होते
अमरेंद्रला जी समस्या होती त्याला हायपोगोनाडिज्म म्हटलं जातं. हाय इन्सुलिन लेव्हलमुळे टेस्टोस्टेरॉन कमी होतं, ज्यामुळे मुलांच्या वाढीदरम्यान त्यांच्या प्रायव्हेट पार्टची वाढही कमी होऊ शकते, फोकस कमी होतो आणि भविष्यात स्पर्म काउंटही कमी होऊ शकतो.
अशात डॉ. सरीन यांनी इशारा दिला की, जर युवावस्थेतच वजन कमी केलं गेलं नाही तर पुढे जाऊन इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि इनफर्टिलीटीसारखी समस्या होऊ शकते. अमरेंद्रला एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि डायटिशिअनचा सल्ला देण्यात आला. त्याने त्याची लाइफस्टाईल बदलली, वजन कमी करण्याचं ट्रेनिंग घेतलं आणि डाएटमध्ये बदल केला. १ वर्षातच त्याचं वजन कमी झालं, सोबतच त्याचा आवाजही पुरूषी झाला. आज अमरेंद्र फार फीट आहे. त्याने वेळेवर उपचार घेतले आणि योग्य लाइफस्टाईल फॉलो केली म्हणून हे सगळं झालं.
Web Summary : Obesity can cause lower testosterone, leading to higher estrogen and a feminine voice in young men. Doctors advise lifestyle changes, weight loss, and diet modifications to address this hormonal imbalance and related issues like infertility. Early intervention is key for better outcomes.
Web Summary : मोटापा टेस्टोस्टेरोन को कम करता है, जिससे एस्ट्रोजन बढ़ता है और लड़कों की आवाज़ बारीक होती है। डॉक्टर जीवनशैली में बदलाव, वजन घटाने और आहार परिवर्तन की सलाह देते हैं। बांझपन जैसी समस्याओं से बचने के लिए जल्दी इलाज ज़रूरी है।