शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'या' लोकांनी चुकूनही करू नये शेवग्याचं सेवन, ठरू शकतं नुकसानकारक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 10:07 IST

Side Effects of Moringa:शेवग्याच्या पानांची भाजी किंवा पावडरचं सेवन केल्याने काही लोकांना नुकसान होऊ शकतं. अशात कुणी शेवग्याच्या पानांचं सेवन करू नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Side Effects of Moringa: शेवग्याच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. याचं सेवन केल्याने अनेक समस्या दूर होतात किंवा शरीराला फायदे मिळतात हे तुम्ही ऐकलं असेलच. पण तरीही शेवग्याच्या पानांची भाजी किंवा पावडरचं सेवन केल्याने काही लोकांना नुकसान होऊ शकतं. अशात कुणी शेवग्याच्या पानांचं सेवन करू नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पचनक्रिया खराब असलेल्यांनी

शेवग्याच्या सेवनाने डायजेशन बिघडू शकतं. जर याचं जास्त सेवन केलं तर यात असलेल्या लॅक्सेटिव तत्वाने उलटी किंवा जुलाब होण्याचा धोका असतो. त्याशिवाय बाउल मुव्हमेंट अॅक्टिव करण्यासाठी लॅक्सेटिव नावाचं तत्व भूमिका बजावतं. अशात लूज मोशनची समस्या होते.

उलटी किंवा मळमळ

अनेकांना शेवग्याची टेस्ट किंवा वास आवडत नाही. अशात ज्यांना असं होतं त्यांनी याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण याने तुम्हाला उलटी किंवा मळमळ होऊ शकते. 

हृदयरोग असलेल्यांसाठी नुकसानकारक

ज्या लोकांना नेहमीच लो ब्लड प्रेशरची समस्या असते, त्यांच्यासाठी शेवग्याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. याच्या पानांमध्ये एल्कलॉइड नावाचं तत्व आढळतं जे हार्ट बीट स्लो आणि  ब्लड प्रेशर कमी करू शकतं. यामुळे हृदयरोग असलेल्यांनी याचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

गर्भवती महिलांनी टाळावं

ज्या महिला गर्भवती आहेत किंवा स्तनपान करतात त्यांनी शेवग्याच्या शेंगाची, पानांची भाजी किंवा पावडरचं सेवन करू नये. अनेक एक्सपर्ट सांगतात यामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. मासिक पाळी दरम्यानही याचं सेवन टाळलं पाहिजे. कारण याने शरीरात पित्त दोष वाढतो.

अजून कुणी टाळावं

थायराईड आणि डायबिटीस असलेल्या लोकांनी शेवग्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. असं सांगण्यात येतं की, या आजारांचं औषध घेत असलेल्यांसाठी शेवग्याचं सेवन करणं चांगलं नाही. तरी तुम्हाला शेवग्याचं सेवन करायचं असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य