शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

HMPV शरीरात कोणत्या भागावर सगळ्यात आधी हल्ला करतो? जाणून घ्या शरीरात काय दिसतात बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:25 IST

HMPV : एक्सपर्टनुसार, हा व्हायरस मुख्यपणे श्वसन तंत्राला प्रभावित करतो आणि याची लक्षणं सामान्य फ्लूसारखीच आहेत.

HMPV : कोविड-१९ नंतर चीनमध्ये शेकडो लोकांना टेंशन देणारे ह्यूमन मेटापनेउमोव्हायरस (HMPV) हळूहळू जगातील इतर देशांमध्येही पसरत आहे. भारतात आतापर्यंत या व्हायरसच्या ५ पेक्षा जास्त केसेस समोर आल्या आहेत. बंगळुरू, अहमदाबाद, तामिळनाडूनंतर आता नागपूरमध्येही याची लागण झालेल्या केसेस आढळल्या आहेत. 

एक्सपर्टनुसार, हा व्हायरस मुख्यपणे श्वसन तंत्राला प्रभावित करतो आणि याची लक्षणं सामान्य फ्लूसारखीच आहेत. कमजोर इम्यूनिटी असणाऱ्या वयस्क लोकांना आणि लहान मुलांना याचं गंभीर इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. 

HMPV सगळ्यात आधी कोणत्या अवयवाला प्रभावित करतो?

हा व्हायरस सगळ्यात आधी फुप्फुसं आणि श्वासनलिकेच्या सेल्सना नुकसान पोहोचवतो, ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते. कफ होतो आणि इतरही समस्या होतात. कमजोर इम्यूनिटी असलेल्या लोकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये याचं इन्फेक्शन लगेच होतं. 

शरीरात काय बदल होतात?

श्वास घेण्यास अडचण

हा व्हायरस श्वसन तंत्राला प्रभावित करतो. ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण होऊ शकते. लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. 

ताप आणि थकवा

या व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यावर ताप, डोकेदुखी आणि शरीरात कमजोरी जाणवते. 

घशात खवखव आणि कफ

HMPV व्हायरस घशाला प्रभावित करतो, ज्यामुळे घशात खवखव, कोरडा खोकला आणि कफही येऊ शकतो. 

श्वास घेण्यास समस्या

व्हायरसचं इन्फेक्शन वाढल्यावर ब्रोंकाइटिस (Bronchitis), न्यूमोनिया (Pneumonia) आणि वायुमार्गात अडथळा यांसारख्या समस्या होऊ शकतात.

शरीरात ऑक्सीजनची कमतरता

या व्हायरसच्या गंभीर केसेसमध्ये शरीरात ऑक्सीजन लेव्हल कमी होऊ शकते. ज्यामुळे हायपोक्सिया (Hypoxia)ची स्थिती तयार होऊ शकते.

कसा कराल बचाव?

एक्सपर्टनुसार, HMPV पासून बचाव करण्यासाठी घरात स्वच्छता ठेवा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि इम्यूनिटी मजूबत ठेवण्याचा प्रयत्न करा. लहान मुलं आणि वयोवृद्धांची अधिक काळजी घ्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स