नारळ पाणी शरीरासाठी कधी ठरतं नुकसानकारक? तुम्ही रोज पिता का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 09:32 AM2024-04-25T09:32:37+5:302024-04-25T09:33:17+5:30

Coconut Water side effects : कधी कधी नारळ पाण्याचं जास्त सेवन करणंही नुकसानकारक ठरू शकतं. हे कधी नुकसानकारक ठरतं आणि कुणासाठी ठरतं ते आज आम्ही सांगणार आहोत.

When is coconut water harmful to the body? Do you drink every day? | नारळ पाणी शरीरासाठी कधी ठरतं नुकसानकारक? तुम्ही रोज पिता का?

नारळ पाणी शरीरासाठी कधी ठरतं नुकसानकारक? तुम्ही रोज पिता का?

Coconut Water side effects : नारळाचं पाणी प्यायल्याने शरीराला किती फायदे मिळतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. शरीर हायड्रेटेड ठेवण्यास, त्वचा चांगली ठेवण्यास, शरीराला अनेक पोषक देण्यास नारळ पाणी मदत करतं. बरेच लोक नारळ पाणी रोज पितात. पण कधी कधी नारळ पाण्याचं जास्त सेवन करणंही नुकसानकारक ठरू शकतं. हे कधी नुकसानकारक ठरतं आणि कुणासाठी ठरतं ते आज आम्ही सांगणार आहोत.

1) नारळ पाणी तसं तर सुरक्षित आणि पोषण असलेलं असतं. हे पाणी शरीर हायड्रेट ठेवण्याची बेस्ट पद्धत मानलं जातं. पण याच्या जास्त सेवनाने आरोग्यासंबंधी काही समस्या होतात.

2) नारळ पाण्यात पोटॅशिअमचं प्रमाण खूप जास्त असतं. याचं जास्त सेवन केल्याने शरीरात पोटॅशिअमचं प्रमाण वाढल्याने इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन होऊ शकतं. ज्यामुळे किडनीसंबंधी समस्या आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.

3) वर्कआउटनंतर पाणी पिणं सगळ्यात चांगलं मानलं जातं. कारण यात भरपूर मीठ असतं जे शरीर एक्सरसाइज करताना निघून जातं. बरेच लोक तहान लागल्यावर एक-दोन ग्लास नारळ पाणी पितात. जे शरीर आणि आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. रोजच्या ऐवजी आठवड्यातून दोन वेळा तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता.
 

4) इतर ज्यूसऐवजी लोक नारळ पाणी पितात. कारण त्यांना असं वाटतं की, यात शुगर कमी असते. पण नारळ पाण्यात प्रति कप 6.26 ग्राम शुगर  असते. अशात डायबिटीस असलेल्यांनी नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. डायबिटीसच्या रूग्णांना रोज नारळ पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. हेही खरं आहे की, फळांच्या ज्यूसच्या तुलनेत या पाण्यात शुगर कमी असते. पण याच्या जास्त सेवनाने कॅलरी वाढू शकतात.

5) नारळ पाण्याच्या अधिक सेवनामुळे काही लोकांना पोट खराब होण्याची आणि सूज येण्याची समस्या होऊ शकते. नारळ पाण्यात काही मूत्रवर्धक गुणही असतात. त्यामुळे याचं सेवन केलं तर लघवी जास्त वेळ येऊ शकते. 

Web Title: When is coconut water harmful to the body? Do you drink every day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.