शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

'या' कारणांमुळेही वाढतो टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 10:21 IST

जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो किंवा साखरेचं सेवन कमी प्रमाणात केल्याने तुम्हाला डायबिटीसचा धोका कमी असतो तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात.

जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो किंवा साखरेचं सेवन कमी प्रमाणात केल्याने तुम्हाला डायबिटीसचा धोका कमी असतो तर तुम्ही चुकीचे आहात. लाइफस्टाईल कशी आहे, तुम्ही काय खाता आणि कसे खाता या तीन मुद्द्यांवर अवलंबून असतं की, तुम्हाला टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका किती आहे. सोबतच तुमचा डायबिटीस बरा झाला असेल तर तुम्हाला अधिक जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.

२ हजार लोकांवर करण्यात आला रिसर्च

अमेरिकेच्या मेरीलॅंड येथील बाल्टीमोरमध्ये झालेल्या न्यूट्रीशन २०१९ च्या मीटिंगमध्ये एका रिसर्चचे निष्कर्ष समोर ठेवले गेले. त्यात सांगण्यात आलं आहे की, एखादी व्यक्ती काय खाते आणि कशाप्रकारे खाते याचा प्रभाव टाइप २ डायबिटीस होण्याच्या शक्यतेवर पडतो. या रिसर्चमध्ये अमेरिकेतील २ हजार ७१२ तरूण-वयस्क लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. आणि त्यांच्या डाएटवर मोठ्या काळासाठी लक्ष ठेवण्यात आलं. तसेच वेळोवेळी फॉलोअपही घेण्यात आला.

या गोष्टींमुळे डायबिटीसचा धोका कमी

ज्या लोकांनी साधारण २० वर्षांपर्यंत फळं, भाज्या, धान्य, नट्स, ड्रायफ्रूट्स आणि व्हेजिटेबल आइल यांचा त्यांच्या आहारात समावेश केला, त्यांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका ६० टक्के कमी झाला. रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, जर जास्त काळासाठी प्लांट बेस्ड डाएटचं जास्त सेवन केलं गेलं तर डायबिटीस होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो.

कसा टाळाल डायबिटीसचा धोका?

(Image Credit : FirstCry Parenting)

जे लोक त्यांच्या डाएटमध्ये पदार्थांमधून किंवा सप्लिमेंट्सच्या माध्यमातून व्हिटॅमिन बी२ आणि व्हिटॅमिन बी६ चं जास्त प्रमाणात सेवन करतात, त्यांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका कमी असतो. एका वेगळ्या रिसर्चमध्ये २ लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यातून समोर आलं की, वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून व्हिटॅमिन बी१२ चं अधिक प्रमाणात सेवन केलं तर टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. याचा अर्थ असा होतो की, अ‍ॅनिमल बेस्ड प्रॉडक्टचं जास्त सेवन केल्यास डायबिटीसचा धोका वाढतो.

कसं खाता याचा ब्लड शुगर लेव्हलशी संबंध

(Image Credit : Healthline)

एका दुसऱ्या रिसर्चनुसार, तुम्ही कशाप्रकारे जेवण करता किंवा काय जेवण करता याचा तुमच्या ब्लड शुगर लेव्हलशी खोलवर संबंध असतो. अभ्यासकांना असं आढळलं की, आधी भात खाणे आणि नंतर भाजी किंवा मांस खाणे यामुळे ब्लड शुगरचं प्रमाण वाढतं. जर आधी भाजी किंवा मांस खाल्लं गेलं आणि नंतर भात खाल्ला तर ब्लड शुगर लेव्हल वाढण्यापासून रोखलं जाऊ शकतं.

  

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन