शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

जर तुम्ही ३० दिवस साखर खाणे बंद केले तर काय होईल? जाणून घ्या याचे परिणाम चांगले की वाईट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:32 IST

जर एखादी व्यक्ती ३० दिवस मिठाई किंवा काहीच गोड खात नसेल तर? तर ते त्या व्यक्तीसाठी चांगले की, वाईट? याचा त्यांच्यावरती काय परिणाम होईल? अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा तुम्ही डायबिटीस पेशंट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असाल तर या दोन्ही बाबतीत तुम्हाला मिठाई न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण गोड अन्न पूर्णपणे सोडून द्यावे का? जर एखादी व्यक्ती ३० दिवस मिठाई किंवा काहीच गोड खात नसेल तर? तर ते त्या व्यक्तीसाठी चांगले की, वाईट? याचा त्यांच्यावरती काय परिणाम होईल? अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

एका सर्वेक्षणातून खुलासा२०१९ मध्ये अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यादरम्यान असे आढळून आले की, एक व्यक्ती दरवर्षी सरासरी २८ किलो साखर वापरते. इतकी साखर शरीरासाठी घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, एका व्यक्तीने एका दिवसात ६-७ चमचे साखर खाल्ली पाहिजे.

जर तुम्ही ते ग्रॅममध्ये पाहिले तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की, एका दिवसात फक्त २५-३० ग्रॅम साखर खावी, जर तुम्ही यापेक्षा जास्त खाल्ले तर तुम्हाला त्याचा अपाय होईल. त्याचवेळी अमेरिकन हार्ट असोसिएशनचे असे म्हणणे आहे की, महिलांनी पुरुषांपेक्षा कमी साखर खावी. यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांनी एका दिवसात १५०कॅलरीज साखरेचा वापर करावा तर महिलांनी फक्त १०० कॅलरीज साखरेचा वापर करावा.

आपण ३० दिवस गोड न खाल्ल्यास काय होईल?अनेक पदार्थांमधून गोड आपल्या पोटात जातं. जवळजवळ प्रत्येक गोड पदार्थांमध्ये साखर वापरली जाते.  साखर गोड असते, आणि ती आरोग्यासाठी विषापेक्षा कमी नाही. गोड काही काळ तुमच्यासाठी चांगले असू शकते परंतु नंतर ते तुम्हाला अनेक आजार देऊ शकते. अशा परिस्थितीत जर ३० दिवस जर एखाद्या व्यक्तीने साखरं खाणं सोडून दिलं तर त्याच्या शरीरासाठी ते फायद्याचं ठरु शकतं आणि ती व्यक्ती एनर्जेटीक फील करते. तसेच यामुळे चिडचिडेपणा कमी होतो आणि यामुळे थकावट देखील होते.

गोड सोडण्याचा योग्य मार्ग कोणता?जर तुम्ही अचानक साखर खाणे बंद केले तर तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागेल. हे टाळण्यासाठी साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या सकाळच्या चहामध्ये २ चमचे साखर घेत असाल, तर आधी ते एक आणि नंतर अर्धा चमचा इतके प्रमाण करा आणि नंतर हळू हळू सोडा.

परंतु आपण फळे, धान्ये इत्यादी गोड गोष्टी खाणे चालू ठेवले पाहिजे. जर तुम्ही गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद केले तर ते तुमच्या शरीरासाठी ते घातक ठरू शकते. गोड पदार्थ खाणे पूर्णपणे सोडून दिल्यानंतर, तुमचे शरीर चरबीपासून ग्लुकोज बनवण्यासाठी केटोन्स तयार करण्यास सुरुवात करते आणि हे केटोन्स शरीरात साठवलेल्या चरबीचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात, ज्यामुळे तुमची चरबी वितळण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेला केटोसिस म्हणतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह