तुम्हाला NEAT बसता येतं का?... 'असं' बसा, नाहीतर आजारांच्या चक्रात फसाल! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 04:20 PM2018-06-08T16:20:02+5:302018-06-08T16:20:02+5:30

'आधी बसू मग बोलू' हे आधुनिक काळातलं परवलीचं वाक्य झालं आहे. पण, शरीराला चलनवलन/व्यायाम न मिळाल्याने 'बेसिक मेटाबॉलिक रेट' (BMR) कमी झाल्यामुळे होणाऱ्या विविध आजारांना निमंत्रण देणारा मात्र आहे.

what is Non Exercise Activity Thermogenesis and how it helps to be fit | तुम्हाला NEAT बसता येतं का?... 'असं' बसा, नाहीतर आजारांच्या चक्रात फसाल! 

तुम्हाला NEAT बसता येतं का?... 'असं' बसा, नाहीतर आजारांच्या चक्रात फसाल! 

Next

>> डॉ. नेहा पाटणकर

दिवसाच्या 24 तासामधील किती वेळ आपण बसलेले असतो? झोपणे,उभे राहणे, बसणे आणि चालणे यांच्यापैकी झोपणे 7/8 तास, चालणे अर्धा /1 तास (रोज चालायला जात असलो तर) सोडल्यास बाकीचा बराचसा वेळ बसण्यातच जातो. दैनंदिन जीवनात कुठे ना कुठे बसतच असतो. 'आधी बसू मग बोलू' हे आधुनिक काळातलं परवलीचं वाक्य झालं आहे.

खायला 'बसतो', गाडी/स्कूटर/बसमध्ये 'बसतो', कॉम्प्युटर समोर 'बसतो', ऑफिसात 'बसतो', मोबाईल/टीव्ही समोर 'बसतो' बसून सारखा टीव्ही बघणाऱ्यांना "couch potato"म्हणतात. हल्ली आपण सगळेजण "मोबाईल/लॅपटॉप वॉटरमेलन" होत आहोत. बसण्याचा इतका अतिरेक झाला आहे की त्याला "sitting disease" असं नाव शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. हा खरं म्हणजे कुठला रोग नाही, तर शरीराला चलनवलन/व्यायाम न मिळाल्याने 'बेसिक मेटाबॉलिक रेट' (BMR) कमी झाल्यामुळे होणाऱ्या विविध आजारांना निमंत्रण देणारा मात्र आहे.

प्रामुख्याने होणारे रोग 
1) डायबेटीस
2) ब्लडप्रेशर
3) हृदयविकार
4) स्थूलपणा
5) पाठदुखी
6) व्हेरिकोज व्हेन्स
7) स्पॉंडीलोसिस (मानेचे आजार)

या सगळ्यांना "लाइफस्टाइल डिसऑर्डर्स"असं म्हणतात.

खरोखरच हे सगळे त्रास अगदी लहान वयातच झालेले दिसतात. शाळेत जाणाऱ्या मुलांची सुद्धा यातून सुटका झालेली नाही. आपण म्हणू की हे अपरिहार्य आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी द्यायला वेळ कोणाला आहे? 

मग व्यायामासाठी खूप वेळ देता येत नसेल तर काही सोपे उपाय आहेत.

बरेचसे या बाबतीत जागरूक असणारे लोक खालील गोष्टी करतात.

1) पिडोमीटर (पावलं मोजणारे मशीन) वापरतात
2) मोबाईलवर बोलताना चालत राहतात (walk the talk)
3) काही कंपन्यामधे स्टँडिंग डेस्क असतात किंवा चालत चालत मिटिंग घेतात
4) लिफ्टनी जाण्याऐवजी जिने चढत जातात.   

हे सगळं कशासाठी तर ही  मेटाबॉलिक रेट वाढवण्याची युक्ती आहे. त्याला NEAT - Non Exercise Activity Thermogenesis म्हणजेच 'नीट' असं म्हणतात. याचा थोडक्यात अर्थ म्हणजे सारखे हलत-डुलत राहणे.

मात्र काही वेळा बसणं अपरिहार्य असतं. बसूनच काम करण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यासाठी मग 'नीट' बसणं हाच त्यावर उपाय आहे. नीट बसणे म्हणजेच ऑफिसमध्ये/टीव्ही बघताना खुर्चीवर बसल्यावर

1) सतत पाय हलवत राहणे
2) काहीतरी जड गोष्ट मांडीवर ठेवून टाचा सारख्या उचलणे
3) Theraband खुर्चीच्या पायाला बांधून पाय हलवणे    

या सगळ्यावर एकदम मस्त उपाय म्हणजे exercise ball वर बसणे. अशा बॉल्ससकट खुर्च्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 'नीट' बसण्यासाठी वेगळ्या प्रकारची खुर्ची वापरणे ही आयडियाच भन्नाट आहे. सतत हलल्यामुळे पोटाचे core muscles चांगले टोन होतात आणि पोटाभोवती फॅट जमा होत नाही. (अर्थात हा बॉल घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

हे सगळं जरी नाही केलं तरी आजपासून आपण बसण्याचे प्रमाण कमी करण्याचा पक्का निर्धार करूया. चला तर मग,आपण सगळे  "नीट" बसूया आणि बसण्यामुळे होणाऱ्या रोगांशी लढण्यासाठी सज्ज होऊया.


 

Web Title: what is Non Exercise Activity Thermogenesis and how it helps to be fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य