What is Vitamin P: सामान्यपणे आपण जे खातो किंवा पितो त्यातून आपल्या शरीराला वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व मिळत असतात. व्हिटॅमिन्सबाबत सगळ्यांनाच माहीत असते. व्हिटॅमिन ए, बी, सी, डी हे सगळ्यांनाच माहीत असतात. मात्र, तुम्हाला व्हिटॅमिन पी बाबत माहीत आहे का? कदाचित नसेल. तर हे व्हिटॅमिन पी काय असतं आणि ते कशातून मिळतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काय आहे व्हिटॅमिन पी?
व्हिटॅमिन पी म्हणजे असं काही जे तुमच्या ताटातून पोटात जाऊन आत्मा तृप्त करतं. यातील 'पी' चा अर्थ 'प्लेजर' म्हणजे 'तृप्ती' आहे. तुम्ही आनंदी तर तुमचं पोट आनंदी आणि पोट आनंदी असेल तर आरोग्य आनंदी. अनेक वर्ष वैज्ञानिकांनी आनंदासाठी खाण्यामागील कारण शोधण्यासाठी रिसर्च केला आहे. त्यातील निष्कर्ष रोमांचक आणि अवाक् करणारे आहेत.
काय सांगतो रिसर्च?
जेवण आपली जीभ आणि मेंदुला संतुष्ट करतं. डोपामाइन हार्मोनचे आरोग्यावर पडणाऱ्या प्रभावाबाबत २०११ मध्ये एक रिसर्च करण्यात आला होता. डोपामाइनला 'फील गुड हार्मोन' असंही म्हटलं जातं. डोपामाइनमुळे आनंद, शांती, प्रेरणा आणि लक्ष केंद्रीत करण्यास मदत मिळते.
काही रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, लठ्ठ असलेल्या लोकांचं डोपामाइन योग्यपणे काम करत नाही आणि त्यामुळेच ते ओव्हरईटिंगचे शिकार होतात. जास्त खाण्याच्या नादात ते आणखी लठ्ठ होतात. जर डोपामाइननं योग्यपणे काम केलं तर आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. जेव्हा आपण जेवण एन्जॉय करत खातो, तेव्हा डोपामाइन अॅक्टिव होतं आणि त्यामुळे आनंद मिळतो. यामुळे अन्न व्यवस्थित पचनही होतं.
जेवण आनंदी होऊन खाणं गरजेचं
जेवण एन्जॉय करत खाणं आणि हेल्दी डाएट यांच्या संबंधाबाबत ११९ रिसर्चवर रिव्ह्यू करण्यात आला होता. यातील ५७ टक्के रिसर्चमध्ये जेवण एन्जॉय करत खाणं आणि हेल्दी डाएट यांच्यात चांगला संबंध आढळून आला. २०१५ च्या एका रिसर्चमध्ये खाण्याबाबत अधिक आनंदाला उच्च पोषण स्थितीसोबत जोडण्यात आलं. काही रिसर्च पौष्टिक, संतुलित आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी हेल्दी डाएटचा आनंदग घेण्याला महत्व देतात.