65 वयातही तरूणांना लाजवणारी आहे नागार्जुनाची फिटनेस, जाणून घ्या त्याचं रोजचं रूटीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:59 IST2025-01-08T16:40:57+5:302025-01-08T16:59:29+5:30

Nagarjuna Fitness Fanda : एक्सरसाईज, डाएट, फास्टिंग करत तो स्वत:ला फिट ठेवतो. नुकत्याच एक इंग्रजी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याचा फिटनेस मंत्रा सांगितला आहे. 

What is the ageless actors Nagarjuna health mantra? | 65 वयातही तरूणांना लाजवणारी आहे नागार्जुनाची फिटनेस, जाणून घ्या त्याचं रोजचं रूटीन!

65 वयातही तरूणांना लाजवणारी आहे नागार्जुनाची फिटनेस, जाणून घ्या त्याचं रोजचं रूटीन!

Nagarjuna Fitness Fanda : साऊथ सिनेमांमध्ये 'युवा सम्राट' आणि 'किंग' म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता नागार्जुना अक्कीनेनी यावर्षी त्याचा ६६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नागार्जुना प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. नागार्जुनाची खासियत म्हणजे इतकं वय होऊनही त्याची फिटनेस आजच्या तरूण कलाकारांना लाजवेल अशी आहे. या वयातही इतका तरूण दिसण्याचा आणि फिट राहण्याचा त्याचा फिटनेस फंडाही कमाल आहे. एक्सरसाईज, डाएट, फास्टिंग करत तो स्वत:ला फिट ठेवतो. नुकत्याच एक इंग्रजी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याचा फिटनेस मंत्रा सांगितला आहे. 

नागार्जुनानं मुलाखतीत सांगितलं की, "मी मिक्स कार्डिओ एक्सरसाईज करण्यावर अधिक भर देतो. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मी हे करत आहे. सातत्य यात फार महत्वाचं आहे. दिवसभर मी काहीना काही अॅक्टिविटी करत असतो. जर मी जिमला गेलो नाही तर मी वॉक करतो किंवा स्वीमिंग करतो".

तो पुढे म्हणाला की, "रोज वर्कआउट करण्याला माझी प्राथमिकता असते. झोपेतून उठल्यावर मी सगळ्यात आधी एक्सरसाईज करतो. आठवड्यातील पाच दिवस मी वर्कआउट करतो. मी रोज साधारण ४५ मिनिटं ते १ तास एक्सरसाईज करतो. ही एक्सरसाईज हाय इंटेन्स असते".

फिटनेसची ट्रिक

नागार्जुनानं मुलाखतीत त्याची एक आवडती ट्रिकही शेअर केली. तो म्हणाला की, "एका ट्रेनरनं मला एक ट्रिक शिकवली होती. कार्डिओ करा किंवा हाय इन्टेन्सिटी एक्सरसाईज हार्ट रेट नेहमीच ७० टक्क्यांच्या वर ठेवा. वर्कआउट दरम्यान आराम करू नका. खाली बसू नका. फोन वापरू नका. मेटाबॉलिज्म दिवसभर हाय ठेवा. सातत्य ठेवणं हा माझा फिटनेस मंत्रा आहे. रोज किमान ४५ मिनिटं एक्सरसाईज करा. हा वेळ भरपूर झाला. तसेच पुरेशी झोप घ्या आणि शरीर हायड्रेट ठेवा".

जेवणाच्या फिक्स वेळा

केवळ एक्सरसाईज करून इतकं फिट राहणं शक्य नाही. अशात नागार्जुन यानं त्याच्या डाएटबाबतही सांगितलं. तो म्हणाला की, "माझी डाएट सतत बदलत आली आहे. जी डाएट शरीर हॅन्डल करू शकत नाही ती वयाच्या ३०व्या वर्षी बदलावी. डाएटमध्ये बदल केल्यामुळं मला आणखी हलकं वाटतं. नाश्ता, दुपारचं जेवण हेल्दी करा. पण रात्रीच्या जेवण सांभाळून करा. मी माझं रात्रीचं जेवण ७ ते ७.३० वाजता संपवतो. जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही".

१२ तास फास्टिंग

अभिनेता नागार्जुनाचा फास्टिंगवरही खूप विश्वास आहे. मी रोज साधारण १४ तासासाठी फास्टिंग करतो किंवा १२ तासांसाठी फास्टिंग करतो. हे फास्टिंग सायंकाळपासून ते दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत असतं".

Web Title: What is the ageless actors Nagarjuna health mantra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.