शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अचानक दारू पिणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतात? शरीरावर काय दिसतात परिणाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 11:46 IST

What happens when you sudden stop drinking: अचानक दारू सेवन बंद केल्याने शरीरावर काय परिणाम होतात. बऱ्याच दिवसांपासून दारू पित असलेल्या लोकांच्या शरीरावर याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

What happens when you sudden stop drinking: दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. हा इशारा दारू विकताना दिला जातो. त्याशिवाय वेगवेगळ्या माध्यमातून दारूच्या नुकसानाबाबत सांगितलं जातं. लोकांना जागरूक केलं जातं. तरीही दारूची विक्री काही कमी होत नाही. पण काही लोक अचानक दारू सोडण्याचा विचार करता आणि यात लोकांना यशही मिळतं. दारू सोडताना सुरूवातीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अचानक दारू सेवन बंद केल्याने शरीरावर काय परिणाम होतात. बऱ्याच दिवसांपासून दारू पित असलेल्या लोकांच्या शरीरावर याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

दारू सोडण्याचे फायदे

जर तुम्ही दारू पिणं सोडलं तर तुमची मानसिक स्थिती सुधारते. कारण रोज दारू प्यायल्याने ह्यूमन बॉडीमध्ये केमिकल रिअॅक्शन होतात. जे मेंदूमध्ये समस्या निर्माण करतात. अशात दारूचं सेवन सोडलं तर तुम्हाला मानसिकरित्या फायदा होईल. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू दारूचं सेवन बंद केलं तर तुमचा मेंदू शांत होईल आणि आधीपेक्षा जास्त एनर्जी तुम्हाला जाणवेल. सोबतच तुम्हाला चांगली झोपही येईल, कामावरील फोकस वाढेल, त्वचाही चांगली होईल आणि पूर्ण दिवस तुम्ही अॅक्टिव रहाल. पण जेव्हा दारूचं व्यसन असणारे लोक जेव्हा अचानक दारू सोडतात तेव्हा काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

अचानक दारू सोडल्याने काय होतं?

'डेलीस्टार'च्या रिपोर्टनुसार, अचानक दारूचं सेवन सोडलं तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. त्याशिवाय तुम्हाला थकवा, तणाव, घाबरेपणा, थरथरणं, चिडचिडपणा, इमोशनल होणं, ब्लड प्रेशर वाढणं, डोकेदुखी, घाम येणं, झोप न येणं, भूक न लागणं, हार्ट बीट वाढणं आणि फोकस न करू शकणं अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे दारू सोडताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.दारूमुळे होणाऱ्या नुकसानाबाबत सर्वांनाच माहीत आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त दारू प्यायल्याने जीवघेणे आजारांचाही धोका असतो. पण दारू सोडल्यावर या आजारांचा धोका कमी असतो. दारू सोडल्यानंतर बॉडीला नॉर्मल कंडीशनमध्ये येण्यासाठी थोडा वेळ लागतो. हे तुमचं वय, वजन, मेंटल स्टेज आणि दारू पिण्याची सवय यावर अवलंबून असतं. जर तुम्ही फार आधीपासून दारू पित असाल तर तुमच्या बॉडीला सामान्य होण्यात जास्त वेळ लागू शकतो.

बॉडी सामान्य होण्याला किती वेळ लागेल?

असं मानलं जातं की, शेवटची दारू प्यायल्यानंतर बॉडीला डिटॉक्स होण्यासाठी साधारण आठवडाभराचा वेळ लागतो. जर तुम्ही रोज दारू पित असाल आणि अचानक दारू पिणं सोडत असाल तर बॉडी रिकव्हर होण्यासाठी वेळ लागेल. दारू प्यायला सुरूवात केल्यापासूनच तुमच्या बॉडीवर वाईट परिणाम होणं सुरू होतात. काही दिवसांनी याचा प्रभाव बॉडीवर दिसू लागतो. सतत दारूचं सेवन केल्याने तुम्हाला उलटी झाल्यासारखं वाटत राहतं. सोबतच डोकेदुखी, जुलाब, बेशुद्धी, मेमरी लॉस, लिव्हर आणि हार्टसंबंधी समस्या, कॅन्सर, डिप्रेशन तसेच शीघ्रपतन अशा समस्यांचा धोका राहतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य