​जॉगिंगपूर्वी काय खाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 17:14 IST2016-12-13T17:14:48+5:302016-12-13T17:14:48+5:30

सकाळी व्यायाम करणे किंवा जॉगिंगला जाणे उत्तमच आहे. मात्र बऱ्याचदा जॉगिंगला जाण्यापूर्वी योग्य माहिती अभावी काहीही खाल्ले जाते आणि त्याचा त्रास होतो तसेच रिकाम्या पोटी जॉगिंग करणेदेखील चुकीचे आहे.

What to eat before jogging? | ​जॉगिंगपूर्वी काय खाल?

​जॉगिंगपूर्वी काय खाल?


/>सकाळी व्यायाम करणे किंवा जॉगिंगला जाणे उत्तमच आहे. मात्र बऱ्याचदा जॉगिंगला जाण्यापूर्वी योग्य माहिती अभावी काहीही खाल्ले जाते आणि त्याचा त्रास होतो तसेच रिकाम्या पोटी जॉगिंग करणेदेखील चुकीचे आहे. व्यायामातून कॅलरीज बर्न करण्यासाठी शरीरात शक्ती असणे गरजेचे आहे. त्यासाठी नेमके काय खावे आणि डायट कसा असावा याबाबत खास टीप्स देत आहोत. 

जॉगिंगपूर्वी तासभर काय खाल?

ग्लासभर पाणी-
व्यायामासोबतच त्याआधीदेखील पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. कारण आहारासोबतच शरीराला मुबलक पाण्याचीदेखील गरज असते. डीहायड्रेशनचा त्रास वाढल्यास चयापचयाचा त्रासदेखील अधिक वाढण्याची गरज आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर किमान ग्लासभर गरम पाणी प्यावे.

बेदाणे आणि बदाम-
धावण्याचा व्यायाम करताना कार्बोहायड्रेटसवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे धावण्यापूर्वी मूठभर बेदाणे आणि बदाम खावेत. यामुळे तुम्हांला प्रसन्न वाटायला मदत होईल. यामुळे मसल्सना दुखापत होण्याचा त्रास कमी होतो. 

जॉगिंगपूर्वी अर्धा तास आधी काय खाल? 

छोटेसे केळ
जॉगिंगपूर्वी अर्धा तास आधी हलका आणि पचायला सोपा नाश्ता करावा. ज्यामुळे व्यायाम करण्यासाठी उर्जा मिळते सोबतच पचनातही अडथळे निर्माण करत नाही. छोटेसे केळ किंवा २-३ हलकी फुलकी बिस्किटं तुम्ही खाऊ शकता.

जॉगिंगपूर्वी काय खाणे टाळाल ?
जॉगिंगपूर्वी भरपूर प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेटस्, सॅच्युरेटेड  फॅट्स, एनर्जी बार खाणे टाळा.  ग्लासभर दूध पिऊन उर्जा मिळत असली तरीही त्यामुळे पोटात बिघाड होऊ शकतात. दुग्धजन्य पदार्थांमुळे कार्बोहायड्रेट्स शोषून घेण्याची क्षमता कमी होते.

Web Title: What to eat before jogging?