जे घरापासून दूर राहतात, त्यांच्या मनात काय सुरु असतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 10:31 AM2018-11-20T10:31:58+5:302018-11-20T10:33:04+5:30

अनेकांना कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर रहावं लागतं. पण घरापासून दूर तुम्ही कितीही ऐशो-आरामात राहत असाल तरी सुद्धा घराची सर नसते.

What are they going to do to stay away from home? | जे घरापासून दूर राहतात, त्यांच्या मनात काय सुरु असतं?

जे घरापासून दूर राहतात, त्यांच्या मनात काय सुरु असतं?

googlenewsNext

(Image Credit : www.goalcast.com)

अनेकांना कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर रहावं लागतं. पण घरापासून दूर तुम्ही कितीही ऐशो-आरामात राहत असाल तरी सुद्धा घराची सर नसते. ३५ टक्के लोकांचं असं म्हणणं आहे. हे असे लोक आहेत जे नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर राहतात, पण त्यांना ते जिथे राहतात तिथे घरासारखं वाटत नाही.

घरापासून दूर राहणाऱ्या ३३ टक्के लोकांना सुरक्षेची तर २७ टक्के लोकांना प्रायव्हसीची चिंता सतावत असते. खास बाब ही आहे की, हे मान्य करणाऱ्या लोकांची संख्या ही २० टक्के होती. म्हणजेच घरापासून दूर राहून वेगळं जाणवणाऱ्या लोकांची संख्या २ वर्षात १५ टक्क्यांनी वाढली आहे. ही आकडेवारी एका फर्नीचर कंपनीकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. 

काय होता विषय?

घरापासून दूर राहून एखाद्या व्यक्तीला काय वाटतं, हे जाणून घेणं या अभ्यासाचा विषय होता.या अभ्यासात २२ देशातील २२ हजार लोकांनी सहभागी करुन घेण्यात आले होते. या २२ देशांमध्ये भारताचाही समावेश होता. या अभ्यासात लोकांनी हेही सांगितलं की, त्यांना नव्या घरात मानसिक समाधान मिळत नाही आणि त्यासाठी ते एकटे राहणं पसंत करतात. 

एकटेपणाची आवड

७२ टक्के लोकांनी सांगितले की, जेव्हा त्यांना मानसिक त्रास होतो तेव्हा ते बेडरुममध्ये एकटे राहणे पसंत करतात. तसेच यातील ४५ टक्के लोकांनी अशा स्थितीत लॉंग ड्राइव्हला जात असल्याचं मान्य केलं. तर ५५ टक्के लोकांनी हे मान्य केलं की, ते स्वत:ला बाथरुममध्ये बंद करुन घेतात. 

बदलत राहतात घरे

अमेरिका आणि यूरोपमधील लोक आयुष्यात सरासरी ११ वेळा घरं बदलतात. पण आशियात हा आकडा कमी आहे. तेच दुसऱ्या एका अभ्यासानुसार, आशियातील लोक आयुष्यात सरासरी ५ ते ६ वेळा घरं शिफ्ट करतात. घराबाहेर राहणाऱ्या ३३ टक्के लोकांना सुरक्षेची तर २७ टक्के लोकांना प्रायव्हसीची चिंता सतावत असते. तर ५३ टक्के लोकांनी हे मान्य केलं की, त्यांना शहरातील त्यांच्या नव्या घरात आपलेपणाची जाणीव होत नाही. इथे ते कितीही सोयी-सुविधा जमवतील पण त्यांना त्यात आपलेपणा वाटत नाही. 

कुटूंब मनाच्या जवळ

लोकांना हाही प्रश्न विचारण्यात आला की, त्यांना कुणासोबत सर्वात चांगलं वाटतं? यावर ५७ टक्के लोकांनी कुटूंबाला प्राधान्य दिलं. ३४ टक्के लोकांनी उत्तर दिलं की, त्यांना मित्रांसोबत जास्त आपलेपणा वाटतो. तर काही लोकांनी उत्तर दिले की, त्यांना कुणासोबतही आपलेपणा वाटत नाही. 

हा आहे नवा ट्रेंड

या अभ्यासातून हेही समोर आले आहे की, आपल्या घराचा वर्कप्लेस म्हणून वापर करण्याचा ट्रेंड वाढत आहे. २५ टक्के लोकांनी सांगितले की, ऑफिसमध्ये जाऊन करण्याच्या तुलनेत त्यांना वर्क फ्रॉम होम अधिक पसंत आहे. २४ टक्के लोकांनी हे सांगितले की, त्यांना ती कोणतीही गोष्ट आपली वाटत नाही, जी त्यांनी घराबाहेर राहून जमवली आहे. 

Web Title: What are they going to do to stay away from home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.