शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

पोटात डावीकडे होणाऱ्या वेदनेची काय कारणे असू शकतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 10:19 IST

पोटात दुखणं एक सामान्य बाब आहे. पण यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. याबाबत नेहमीच सतर्क असायला हवं. कारण कधी-कधी पोटात दुखणं हे सामान्य असेलच असं नाही.

(Image Credit : clinicalpainadvisor.com)

पोटात दुखणं एक सामान्य बाब आहे. पण यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. याबाबत नेहमीच सतर्क असायला हवं. कारण कधी-कधी पोटात दुखणं हे सामान्य असेलच असं नाही. अनेकदा पोटात एकाच बाजूला दुखत असतं. सर्वात  जास्त प्रकरणांमध्ये असं पाहिलं जातं की, लोकांच्या पोटात डावीकडे वेदना होतात. पोटाच्या वेगवेगळ्या भागात वेदना होण्याची वेगवेगळी कारण असू शकतात. असंही असू शकतं की, पोटाच्या एका भागातील काही अवयवांमध्ये काही समस्या असू शकते. चला जाणून घेऊ असीच काही कारणे...

गॅस्ट्रायटीस

गॅस्ट्रायटीस ही पोटाची एक सामान्य समस्या आहे. हे पोटाच्या लायनिंगमध्ये सूज आल्याने असं होतं. सामान्यता ही समस्या त्या लोकांमध्ये अधिक होते, जे अल्कोहोलचं सेवन करतात. अनेकदा गॅस्ट्रायटीसची समस्या अल्सरमध्येही रूपांतरित होते. जर तुमच्या पोटाच्या डाव्या बाजूने काही दिवस सतत वेदना होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अपचनाची समस्या

पोटात दुखण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे अपचन मानलं जातं. अनेकदा याने पोटात जळजळ, ब्लोटिंग आणि अॅसिडमुळेही होतं. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये अपचनाच्या समस्येमुळे पोटाच्या डावी बाजूने वेदना होतात. 

स्टोन

किडनीमध्ये जर स्टोन असेल तर पोटाच्या डावी बाजूने वेदना होतात. किडनी स्टोन तेव्हा होतो जेव्हा किडनीमध्ये मिनरल्स जमा होतात. किडनीमध्ये छोटे स्टोन झाले तर दुखत नाही, पण यांचा आकार सामान्यापेक्षा अधिक झाल तर पोटात वेदना होतात. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोटाच्या नसा ताणल्यामुळे...

अनेकदा पोटात दुखण्याची समस्या पोटातील नसा ताणल्या गेल्यामुळेही होते. काही लोकांमध्ये ही समस्या एक्सरसाइजमुळेही होते. पोटात ज्या भागातील नस ताणली जाते, त्या भागात वेदना होतात. डावीकडे ही समस्या अधिक होते, कारण सामान्यपणे व्यक्तीचा उजवा भाग एक्सरसाइज करण्यात अधिक सक्षम असतो.

कॅन्सरचाही धोका

अनेकदा पोटात दुखण्याचं कारण कॅन्सरही असू शकतं. कारण पोटात कॅन्सरच्या सेल्स जेव्हा सुरूवातीच्या स्टेजमध्ये असतात. तेव्हा वेदना होतात. जर तुम्हाला नेहमीच किंवा जास्त काळासाठी पोटात दुखत असेल तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स