ऑफिसमध्ये बसून वजन वाढलय? 'या' उपायांचा वापर कराल तर आकर्षक दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 10:02 AM2020-01-12T10:02:11+5:302020-01-12T10:21:51+5:30

सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या ही सगळ्याच वयोगटात सगळ्यात जास्त जाणवते.

Weight loss tips: how can busy people lose weight | ऑफिसमध्ये बसून वजन वाढलय? 'या' उपायांचा वापर कराल तर आकर्षक दिसाल

ऑफिसमध्ये बसून वजन वाढलय? 'या' उपायांचा वापर कराल तर आकर्षक दिसाल

Next

(image credit- thesouthafrican.com)

सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या ही सगळ्याच वयोगटात सगळ्यात जास्त जाणवते. जे लोक फिल्डवर्क करत असतात. त्याच्या तुलनेत ऑफिसमध्ये कंटिन्यू बसून काम करत असलेल्या लोकांचे वजन अधिक असतं. कारण बराचवेळ बसून राहील्यामुळे अशा लोकांच्या शरीराची हालचाल होत नाही. तसंच खाण्यापिण्यात अनेक गोष्टी येत असतात. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी वाढायला सुरूवात होते. पण जर तुम्हाला  वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही  ऑफिसमध्ये अनेक तास बसून काम करून सुद्धा वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

सर्वसाधारणपणे महिला या जास्तवेळ ऑफिसमध्ये बसून काम करत असतात. त्यावेळी त्यांच्या कमरेचा, मांड्यांचा तसंच  मागचा भाग वाढत जातो.  जिन्स किंवा टी- शर्ट असे कपडे घट्ट व्हायला लागतात. त्यामुळे लूज कपडे घालून  ऑफिसमध्ये यावं लागतं जर तुमच्या बाबतीत पण असं होत असेल तर तुम्ही  या खास टीप्सचा वापर करून  स्वतःची शरीरयष्टी आकर्षक बनवून प्रेझेंटेबल दिसू शकता. 


 

स्वतःकडे लक्ष द्या 

सगळ्यात तुम्ही तुमच्या ऑफिसची वेळ आणि आरामाची वेळ निश्चित करा. त्यानंतर स्वतःसाठी वेळ काढा आणि या वेळात व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.  त्यासाठी जीमला जाऊन वर्कआऊट आणि कार्डिओ व्यायाम करा. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहील. तसंच तुमचा मुड सुद्धा फ्रेश राहील. तुम्हाला आपण इतरांपेक्षा लठ्ठ आहोत असं वाटणं बंद होईल.

 घरी तयार केलेले जेवण 

शक्यतो तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर बाहेरचं अन्नपदार्थ खाणं टाळा. कारण  बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे वजन अधिक वाढण्याची शक्यता असते. ऑफिसमध्ये असताना आपण अनेकदा फ्रेंड्स सोबत बाहेरचे अन्नपदार्थ खात असतो.  त्यामुळे तुमच्या जीभेवर तुमचा ताबा राहत नाही आणि वजन वाढत जातं. अशी परिस्थिती टाळण्यासाठी  घरी तयार केलेला नाष्ता अथवा जेवणाचा आहार घ्या . कारण घरी तयार केलेले पदार्थ शरीरासाठी अपायकारक ठरत नाही.

रोजच्या डाएटवर कंट्रोल

Related image

(image credit-yahoo.co)

जर तुम्ही वजन कमी करण्याचं ठरवलं असेल तर त्यासाठी व्यवस्थीत डाएट करणं सुध्दा महत्वाचं असतं. यासाठी तुम्ही स्वतःचा डाएड चार्ट तयार करा. ऑफिसमध्ये भूक लागल्यानंतर किंवा संध्याकाळच्यावेळी भूक लागल्यानंतर स्नॅक्स घेणं टाळा. मोबाईलचा वापर न करता शक्य होईल तितक्या लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.

(हे पण वाचा:पाळी वेळेवर येत नसेल तर 'ही' असू शकतात कारणं, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला)

वेटलॉसचे ध्येय

जर तुम्हाला वजन कमी करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल  तर तुम्ही रोज प्रयत्न करणं गरजेचं आहे.  कारण ही एका दिवसात पुर्ण होणारी प्रकिया नसते. त्यासाठी तुम्हाला तीन जोपर्यत बदल दिसून येत नाही. तोपर्यंत  मेहनत करावी लागत असते. कारण अनेकजण संकल्प करतात पण तो पूर्ण करत नाहीत. त्यामुळे बदल दिसून येत नाही.  व्यायाम नियमीत केल्याने तसंच आहारात बदल केला तर वजन नक्की कमी होईल.

Web Title: Weight loss tips: how can busy people lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.