शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात आलं लठ्ठपणा कमी करण्याचं इंजेक्शन, वर्षभरात तब्बल 'इतकं' किलो वजन घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 17:56 IST

या उपायात तुम्हाला ना डाएट करावं लागणार ना जिममध्ये व्यायाम कारवा लागणार फक्त घ्याव लागणार एक इंजेक्शन.

वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासन्तास घाम गाळतात. अक्षरश: पोटाची खपली पडेपर्यंत डाएट करतात. पण याचा फायदा किती होतो हे तुम्हाला माहितीच असेल. पण यावर एक रामबाण उपाय आला आहे. मुख्य म्हणजे या उपायात तुम्हाला ना डाएट करावं लागणार ना जिममध्ये व्यायाम कारवा लागणार फक्त घ्याव लागणार एक इंजेक्शन.

तुम्हाला खरं वाटत नसेल पण ब्रिटनमध्ये एक असं इंजेक्शन आलं आहे ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल. हे इंजेक्शन दर आठवड्याला लठ्ठ व्यक्तींना लावलं जाणार आहे. खरंतर याची तयारीच सुरु झालीये. बीबीसीच्या रिपोर्टनुसार या इंजेक्शनची ट्रायल यशस्वी झाली आहे. या अशाप्रकारच्या उपाचाराला semaglutide असं म्हटलं जातं.

semaglutide हे एकप्रकारचे औषध आहे जे भुक कमी करते.  जेव्हा हे इंजेक्शन लावले जाते तेव्हा भुक कमी लागते व त्यामुळे ती व्यक्ती कमी खाते. याचा परिणाम म्हणजे त्या व्यक्तीचं वजन कमी होतं. ट्रायल दरम्यान असं निदर्शनास आलं की योग्य डाएट अन् व्यायाम करण्यासोबतच ज्या व्यक्तींना हे इंजेक्शन देण्यात आलं त्या व्यक्तींचं वजन ६८ आठवड्यात १२ टक्क्यांनी कमी झालं.

डेली मेल या वेबसाईटनुसार ज्या व्यक्तींना हे इंजेक्शन देण्यात आलं त्या व्यक्तींचं वजन वर्षभरात १६ किलोनं कमी झालं. या इंजेक्शनच्या वापराला National institute for health and care excellence (NICE) नं मान्यता दिली आहे. ज्यांचा बॉडी इंडेक्स मास ३५ च्या वर आहे, त्यांना हे इंजेक्शन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. बीएमआय ३० ते ३५ असणाऱ्या व्यक्तीही डॉक्टरांच्या सल्ल्याने हे इंजेक्शन वापरु शकतात.

हे इंजेक्शन घेणाऱ्यांना सुचना देण्यात आली आहे की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे इंजेक्शन घेणं थांबावावं अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील.हे इंजेक्शन आतापर्यंत बाजारात आलेले नाही. पण NICEच्या गाईडलाईन्स पुर्ण झाल्यावरच हे इंजेक्शन बाजारात येणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स