शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

झटपट वजन कमी करायचंय?; नाश्त्यामध्ये खा 'हा' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 14:33 IST

लठ्ठपणाच्या समस्येन सध्या प्रत्येकजण हैराण आहे. धावपळीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर, लहान मुलांनाही लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

लठ्ठपणाच्या समस्येन सध्या प्रत्येकजण हैराण आहे. धावपळीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर, लहान मुलांनाही लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शरीराचं वजन कमी करण्यासाठी ओट्स फायदेशीर ठरतात. ओट्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. तसेच शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्वही असतात. ओट्सच्या सेवनाने पोट बऱ्याचवेळ भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे तुम्ही ओवर इटिंगपासून दूर राहू शकता. तसेच बराच वेळ पोट भरल्याप्रमाणे राहिल्याने सतत भूकही लागत नाही. 

तुम्हाला माहीत आहे का? हेच ओट्स रात्रभर पाण्यामध्ये भिजवून खाल्याने कमी वेळात वजन कमी करण्यासाठी मदत होते. ओट्स गॅसवर शिजवून खाण्याऐवजी रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ले तर यामध्ये न्यूट्रिएंट्स वाढतात आणि लवकर वजन कमी करतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजत ठेवलेले ओट्स कसे फायदेशीर ठरतात त्याबाबत...

वेगाने वजन कसं कमी करतात भिजवलेले ओट्स? 

रात्रभर भिजवलेले ओट्स सकाळी एकदम मुलायम होतात. हे पचण्यासही हलके असतात आणि पौष्टिकही असतात. बराच वेळ भिजत ठेवल्याने ओट्स दही किंवा दूधाचं सर्व पोषण समाविष्ट होतं. भिजवलेले ओटस खाल्याने आतड्यांमधील अस्वच्छ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे फॅट्स बर्न होण्यास मदत होते. तसेच यामध्ये स्टार्च लेव्हल कमी होतं. ज्यामुळे शरीरामध्ये स्टार्च लेव्हल कमी होते. ज्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण राखण्यास मदत होते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार