शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

हडकुळं शरीर कमजोर दिसतं! थकवा तर जाणवतोच, मग 'या' आहेत वजन वाढवण्याच्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 17:26 IST

वजन वाढवण्यासाठी तांदूळ (Rice For Weight Gain) हा आहारातला घटक खूप महत्त्वाचा ठरतो. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि खूप कॅलरीज असतात. यामुळे वजन झटपट वाढायला मदत होते. वजन वाढीसाठी तांदूळ कोणत्या प्रकारे आहारात घेता येईल.

लठ्ठपणा ही सध्या अनेकांसाठी मोठी समस्या बनली आहे. वाढलेलं वजन अनेक आजारांना निमंत्रण देतं, तसंच कमी वजनामुळंही अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. निरुत्साह, दम लागणं, एनर्जीचा अभाव यामुळं आयुष्य कंटाळवाणं होतं. म्हणूनच वजन वाढवण्यासाठी (Weight Gain) योग्य आहार आणि त्याला पूरक असा व्यायाम करणं गरजेचं असतं. वजन वाढवण्यासाठी तांदूळ (Rice For Weight Gain) हा आहारातला घटक खूप महत्त्वाचा ठरतो. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि खूप कॅलरीज असतात. यामुळे वजन झटपट वाढायला मदत होते. वजन वाढीसाठी तांदूळ कोणत्या प्रकारे आहारात घेता येईल.

भारतात तांदूळ अनेक भागांमध्ये दैनंदिन आहाराचा भाग आहे. काही भागांत तर तांदूळ हेच मुख्य अन्न आहे. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये तांदळापासून अनेक पदार्थ केले जातात. महाराष्ट्रात कोकणात तांदूळ (Konkan Region of Maharashtra) पिकवला व खाल्ला जातो. ईशान्येकडील राज्यांमध्येही तांदूळ खाल्ला जातो. अनेक घरांमध्ये दिवसात दोन्ही जेवणांमध्ये भात असतो. यावरून तांदळाची आपल्याकडे असलेली लोकप्रियता लक्षात येईल. वजन कमी करणाऱ्यांना भात वर्ज्य करायला सांगितला जातो. मात्र वजन वाढवणाऱ्यांना तांदूळ खायला हरकत नसते. आहारात तांदूळ अनेक प्रकारांनी समाविष्ट करता येतो. भाताचे अनेक प्रकार, इडली-डोसा, खीर, घावन असे अनेक पदार्थ तांदळापासून करता येतात.

वरण-भात-रोज दुपारच्या जेवणात वरण-भात (Dal-Rice) किंवा डाळ-भात खाणं वजनवाढीसाठी फायद्याचं ठरू शकतं. वरण-भातामुळे व्हिटॅमिन आणि प्रोटिन दोन्ही शरीराला मिळतं. वरण-भात नियमित खाल्ल्यास वजन वाढू शकतं.

बिर्याणी-बिर्याणी (Biryani) हा भाताचा प्रकार खूपच चविष्ट असतो आणि वजनवाढीसाठीही पूरक ठरू शकतो. यात भरपूर भाज्या घालून त्यातील पोषणमूल्य आणखी वाढवता येतात. मांसाहारी बिर्याणी वजन वाढवायला अधिक उपयुक्त असते. त्यामुळे वजन वाढवायचं असेल, तर घरी केलेली बिर्याणी खाता येईल.

खिचडी-खिचडी वजन कमी करण्यासाठीच नाही, तर वजन वाढवण्यासाठीही फायदेशीर असते. खिचडी पचायला हलकी असते. त्यामुळे ती खाऊन लगेचच पुन्हा भूक लागायची शक्यता असते. खिचडीत डाळ अधिक घालता येऊ शकेल. मूग डाळ घालूनही खिचडी (Khichadi) करता येते. वजन वाढवण्यासाठी खिचडीसोबत कोशिंबिर, लोणचं खाता येईल. खिचडी आवडत नसेल, तर पुलावाच्या स्वरुपातही तांदूळ खाता येईल.

तांदळाची खीर-वजन वाढीसाठी फुल फॅट मिल्क अर्थात सायीसकट दुधामध्ये खीर करा. त्यात बदाम, काजू, बेदाणे घालून खिरीला पौष्टिकही करा. वजन वाढवण्यासाठी आठवड्यातून 3-4 वेळा तांदळाची खीर (Rice Dessert) खाणं हिताचं ठरतं.

वजनवाढीसाठी दररोजच्या जेवणात 1/3 कप तांदूळ असला (Use Rice In Regular Diet) पाहिजे. यापेक्षा जास्तही घेता येतो. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईस अधिक लाभदायक असतो. कमी वजनाच्या व्यक्ती कृष व आजारी दिसतात. काही इनफेक्शन्सना त्या पटकन बळी पडू शकतात. त्यामुळे शरीराचं पुरेसं वजन ठेवणं आवश्यक असतं. तांदळाचे हे पदार्थ खाऊन तुम्ही वजन वाढवू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स