ऑफिसमध्ये पॅनिक अटॅक आला तर कसा कराल कंट्रोल? जाणून घ्या पॅनिक अटॅकची लक्षणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 10:42 AM2019-09-11T10:42:54+5:302019-09-11T11:06:28+5:30

लोकांची लाइफस्टाईलच अशी झाली आहे की, कितीही प्रयत्न करा ते या समस्यांपासून वाचू शकत नाहीत. पण या समस्या मॅनेज नक्कीच करता येतात.

Way to handle panic attack at work place, Know the symptoms of panic attack | ऑफिसमध्ये पॅनिक अटॅक आला तर कसा कराल कंट्रोल? जाणून घ्या पॅनिक अटॅकची लक्षणे...

ऑफिसमध्ये पॅनिक अटॅक आला तर कसा कराल कंट्रोल? जाणून घ्या पॅनिक अटॅकची लक्षणे...

googlenewsNext

(Image Credit : huffingtonpost.in)

अलिकडे चिंता आणि तणाव यांसारख्या मानसिक समस्या फारच सामान्य झाल्या आहेत. लोकांची लाइफस्टाईलच अशी झाली आहे की, कितीही प्रयत्न करा ते या समस्यांपासून वाचू शकत नाहीत. पण या समस्या मॅनेज नक्कीच करता येतात. जर कधी ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला पॅनिक अटॅक आला तर चिंका करू नका. पॅनिक अटॅक मॅनेज करण्याच्या काही टिप्स आम्ही सांगणार आहोत.

पॅनिक अटॅकची लक्षणे

कामाचा अधिक दबाव किंवा एखाद्या गोष्टीच्या तणावामुळे पॅनिक अटॅक कधीही येऊ शकतो. जर ऑफिसमध्ये तुम्ही अशाप्रकारच्या समस्येने पीडित झालात तर टेन्शन घेऊ नका. पॅनिक अटॅकच्या लक्षणांमध्ये जास्त भीती किंवा घबराहट वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, श्वास घेण्यास अडचण इत्याही आहेत.

श्वासांवर लक्ष केंद्रीत करा

(Image Credit : drweil.com)

पॅनिक अटॅक आला तर लोकांमध्ये सर्वात सामान्य समस्या असते ब्रीदिंगची समस्या. एकतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो किंवा श्वास फार लवकर लवकर घेऊ लागतात. असं होत असेल तर पूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रीत करा. मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा श्वास नॉर्मल होईल तेव्हा हार्टबीट आपोआप सामान्य होतील.

विचारांना दाबू नका

(Image Credit : entrepreneur-resources.net)

स्वत:ला सांभाळल्यानंतर मनात येत असलेल्या विचारांना एखाद्या कागदावर लिहीणे सुरू करा. असं करून तुम्हाला हलकं वाटेल. जर असं करणं शक्य नसेल तर एखाद्या आवडत्या गोष्टीचा विचार करणे सुरू करा. डोळे बंद करून श्वास नॉर्मल ठेवून मन चांगल्या गोष्टीत लावा. तसेच असा विचार करा की, ही समस्या काही वेळापुरती आहे. कारण पर्मनन्ट काहीच नसतं.

गोंधळ घालू नका

पॅनिक अटॅक आल्यावर या गोष्टीपासून बचाव करणं कठिण होतं. पण असं अजिबात करू नका. कामाच्या ठिकाणी गोंधळ घातल्याने किंवा भीती अशाप्रकारे जाहीर केल्याने तुमचे सहकारी डिस्टर्ब होतात. सोबतच तुमचीही चिंता अधिक वाढते.

घरी जाण्याबाबत विचार नका करू

(Image Credit ; dailymail.co.uk)

पॅनिक अटॅक आल्यावर ऑफिसमधून घरी जाण्याचा विचार योग्य नाही. ऑफिसमधील वरिष्ठांना तुमच्या स्थितीबाबत सांगा आणि एखाद्या शांत ठिकाणावर जाऊन स्वत:ला शांत करण्याचा प्रयत्न करा. थंड पाणी किंवा आवडीचं ड्रिंक घ्या. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे नॉर्मल होत नाहीत, तोपर्यंत घरी जाण्याचा विचार करू नका. कारण वाटेत स्थिती अधिक बिघडली तर समस्या वाढू शकते. त्यामुळे ऑफिसमध्येच राहणं ठीक ठरेल.

समस्येसारखा उपायही कॉमन

पॅनिक अटॅकची समस्या जेवढी कॉमन आहे, तेवढाच यावरील उपायही कॉमन आहे. ही समस्या थेरपी आणि औषधांच्या माध्यमातून ठीक केली जाऊ शकते. जर तुम्हाला पॅनिक अटॅकची समस्या नेहमीच होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

Web Title: Way to handle panic attack at work place, Know the symptoms of panic attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.