बाबो! मस्करी मस्करीत पठ्ठ्यानं ३६० डिग्रीत फिरवली मान; पाहा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 08:03 PM2020-12-10T20:03:39+5:302020-12-10T20:18:35+5:30

Viral Video in Marathi : स्वतःला चॅम्प समजत असाल तर हे करून दाखवा असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Watch guy twisting his neck full 360 degree video goes viral | बाबो! मस्करी मस्करीत पठ्ठ्यानं ३६० डिग्रीत फिरवली मान; पाहा भन्नाट व्हिडीओ

बाबो! मस्करी मस्करीत पठ्ठ्यानं ३६० डिग्रीत फिरवली मान; पाहा भन्नाट व्हिडीओ

Next

अनेक हॉरर चित्रपटांमध्ये तुम्ही भयावह दृश्य नेहमीच पाहत असाल. हॉरर चित्रपटात पाहिलेल्या सीनच्या चर्चा अनेकवेळा होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. @GaurangBhardwa या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वतःला चॅम्प समजत असाल तर हे करून दाखवा असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  आतापर्यंत १९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून १ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. 

या व्हिडीओला गमतीशीर कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगा समुद्र किनारी बसला आहे आणि आपली मान फिरवत आहे. ट्विटरवर लोक या मुलाच्या टॅलेंटचे कौतुक करत आहेत. 

दरम्यान  काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  व्हिडीओमध्ये एक महिला  लाल साडीमध्ये बॅक फ्लिप मारत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर युजर आकाश रानिसनने शेअर केला होता. हा व्हिडीओ रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला जमिनीवर साडी घालून बॅकफ्लिप मारत आहे. सोफा, खुर्चीपेक्षा जास्त फायदेशीर ठरतं जमिनीवर बसणं; जाणून घ्या 'ही' ४ वैज्ञानिक कारणं

या व्हिडीओला कॅप्शन दिलं होतं की, महिला सगळं काही करू शकतात जे पुरूष करू शकतात. इतकंच नाही पुरूषांपेक्षा अधिक चांगले करू शकतात. इंटरनेटवर हा व्हिडीओ रेकॉर्ड तोड व्हायरल होत आहे. या महिलेला काहीजणांना टँलेंटचे पावरहाऊस असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ २० नोव्हेंबरला  इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता.  कोरोनापासून बचावासाठी 'हा' नवा नियम पाळावाच लागणार; WHO च्या तज्ज्ञांची माहिती

Web Title: Watch guy twisting his neck full 360 degree video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.